भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:09 PM2018-01-23T22:09:17+5:302018-01-23T22:09:33+5:30

ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला. या वक्तव्यावर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गिर्ये रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करुन जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.

BJP district president burnt the statue, Giriya incident | भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना

भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना

googlenewsNext

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला. या वक्तव्यावर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गिर्ये रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करुन जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला आहे आणि तो पूर्णत्वास नेणारही अशी वल्गना दोन दिवसांपूर्वी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत गिर्ये गावच्या ग्रामस्थांनी व संघर्ष समितीने गिर्ये कँटींग येथे मंगळवारी प्रमोद जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले. यावेळी ग्रामस्थांनी प्रमोद जठार मुदार्बाद अशा घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी गिर्ये गावचे संघर्ष समितीचे अध्यक्ष मुनाफ ठाकुर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, आरिफ बगदादी, बबन घाटये, प्रभाकर देवळेकर, शरजु घाटये, अतुल आंबेरकर, संदिप डोळकर, रामचंद्र शिर्के व बहुसंख्य गिर्ये-रामेश्वर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 
यानंतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना गिर्ये ग्रीन रिफायनरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मुनाफ ठाकुर म्हणाले कि, गिर्ये-रामेश्वर गावामध्ये होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दोन्ही गावे संघर्ष करुन तो हटविण्यासाठी लढा देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी या ठिकाणी ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच केलेले हे वक्तव्य म्हणजे येथील जनतेवरती आघातच केल्यासारखा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग हे गाव असून या ठिकाणी पर्यटनाचे प्रकल्प शासनाने व जठारांनी आणावे त्यांना आम्ही मोफत जमीन द्यायला तयार आहोत.  मात्र विनाशकारी आणि येथील आंबा पिक नष्ट करणारे प्रकल्प आणू नयेत. जठार यांना या प्रकल्पामधून कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. म्हणूनच ते हा प्रकल्प व्हावा असे सांगत आहेत. स्वार्थापोटी व स्वत:ला मिळणा-या फायद्यासाठी जठार हे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
संदिप डोळकर म्हणाले, माजी आमदार प्रमोद जठार यांना येथील जनतेने आमदार म्हणून निवडून दिले होते. त्या आमदारकीच्या काळात त्यांनी एकाही व्यक्तीला व बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्पातून १ लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बेताल वक्तव्य करुन येथील जनतेची दिशाभुल करीत आहेत. 

जठार यांनी गिर्ये गावात येऊनच दाखवावे
स्वत:चे राजकिय अस्तित्व व विधान परिषदेवरती आमदारकी व कोट्यवधी रुपये प्रकल्पातून मिळण्याच्या आशेनेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असल्याचे बेताल वक्तव्य जठार करीत आहेत. त्यांना येथील जनता कधीही क्षमा करणार नसून यापुढील जठार यांनी गिर्ये गावामध्ये येऊनच दाखवावे असे आव्हान डोळकरसह तेथील उपस्थित ग्रामस्थांनी केले आहे.

जनता आता गप्प बसणार नाही
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा पवार म्हणाल्या की, ग्रीन रिफायनरी प्रकल्पापेक्षा प्रमोद जठार हेच विनाशकारी आहेत. येथील लोकांचा विनाश करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. यामुळे येथील जनता आता गप्प बसणार नसून प्रकल्प याठिकाणी कदापी होऊ देणार नाही. आणि प्रमोद जठार यांनाही गिर्ये गावामध्ये पाय ठेवू देणार नाही असे त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP district president burnt the statue, Giriya incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.