शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

वाढीव वीजबिलांबाबत भाजप आक्रमक, वीज वितरणचे अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:16 IST

कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

ठळक मुद्देवाढीव वीजबिलांबाबत भाजप आक्रमक, वीज वितरणचे अधिकारी धारेवर वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक

कुडाळ : कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.वीज बिल दरवाढीविरोधात कुडाळ भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. या प्रश्नी वीज वितरणच्या कार्यालयात त्यांनी धडक दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, कुडाळ शक्ती केंद्रप्रमुख राजू बक्षी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, नगरसेवक सुनील बांदेकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, निलेश तेंडुलकर, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, राजवीर पाटील, प्रितेश गुरव, प्रसन्न गंगावणे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे गेले चार महिने सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडलेला असताना महावितरण कंपनीने दिलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने उपअभियंता लोकरे यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले.कोरोना महामारीने गेले ४ महिने सामान्य माणूस आधीच मेटाकुटीस आलेला असताना कुडाळतील नागरिकांना जास्तीची आलेली बिले ही कंबरडे मोडणारी आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात नागरिकांसमोर ही एक वेगळीच आपत्ती आली आहे.

नागरिकांकडून वीज बिलापोटी जास्तीचे पैसे आकारण्यात आले आहेत ती रक्कम नंतरच्या बिलात कमी केली जाणार आहे, असे आश्वासन लोकरे यांनी दिले. कुडाळ नगरपंचायतीची वेळोवेळी महावितरणकडून बदनामी केली जाते. ती थांबवण्यात यावी, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.दंडात्मक कारवाई करू नयेकोकणातील माणूस वेळेवर बिल भरत असूनही लोकांना जास्तीची बिले पाठविण्यात आली आहेत. गणेश चतुर्थी तोंडावर असताना लोकांना कसल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करू नका, असे रणजित देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करू नये असे रणजित देसाई यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग