कणकवली : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्याचे वृत्त समजताच शनिवारी कणकवली शहरात भारतीय जनता पार्टी मार्फत एकच जल्लोष करण्यात आला. तसेच विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी शहरातून रॅलीही काढली .कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली . यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे , माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर , संदीप मेस्त्री, सोनू सावंत , नगरसेवक संजय कामतेकर , अभिजीत मुसळे , राकेश परब , सदा चव्हाण, समर्थ राणेकिशोर राणे, चारुदत्त साटम, नितीन नलावडे, रमेश पावसकर, संतोष राणे, सचिन पारधिये, समीर सावंत आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष ! फटाक्यांची आतषबाजी : रॅली काढून आनंद केला व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:19 IST
कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली .
कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष ! फटाक्यांची आतषबाजी : रॅली काढून आनंद केला व्यक्त
ठळक मुद्दे कणकवली शहरातून शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली.