सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीत दुचाकीला गव्याने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मनोज धोंडू सावंत (२९, रा. इन्सुली-डोबाशेळ) हा जखमी झाला. घाट रस्त्यावर दहा ते बारा गवे अचानक समोर आल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली डोबाशेळ येथील मनोज सावंत हा युवक आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडी येथून घरी येत होता. दरम्यान, घाटात अचानक गव्यांचा कळप दुचाकीसमोर आला. यात एका गव्याला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यावेळी स्वागत नाटेकर, नितीन राऊळ, अनिरुद्ध पालव, रामचंद्र पालव, पिंट्या नाईक, आशीर्वाद पालव, संकेत राऊळ, महेंद्र पांडे यांनी जखमीला मदत केली.
English
हिंदी सारांश
Web Title : Biker Injured in Gaur Attack on Mumbai-Goa Highway
Web Summary : A biker, Manoj Sawant, was injured near Insuli after his motorcycle collided with a gaur. The incident occurred when a herd of gaur suddenly appeared on the Mumbai-Goa highway, causing the accident. Sawant received immediate assistance from locals.

Web Title : मुंबई-गोवा राजमार्ग पर गौर के हमले में बाइक सवार घायल
Web Summary : मुंबई-गोवा राजमार्ग पर इंसुली के पास एक बाइक सवार, मनोज सावंत, एक गौर से टकराकर घायल हो गया। यह घटना तब हुई जब गौर का एक झुंड अचानक राजमार्ग पर आ गया, जिससे दुर्घटना हो गई। सावंत को स्थानीय लोगों से तत्काल सहायता मिली।