शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

By सुधीर राणे | Updated: November 26, 2022 19:10 IST

'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार

कणकवली : सगळ्यात निष्क्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रूपाने राज्याने गेल्या अडीच वर्षात पाहिला. भाजपाशी बेईमानी करत त्यांनी सरकार बनवले आणि ते जनतेचा अपेक्षा भंग करणारे ठरले. ठाकरे सरकारच्या काळातच कोकणचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार ते नुकसान निश्चित भरून काढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आज, शनिवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात सर्वात मोठे यश केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळेल. ३२५ ग्रामपंचायतीपैकी ७५ टक्केहून अधिक ग्रामपंचायती भाजप जिंकेल. 'महिला वांरीयर्स' बनविण्याचे काम आम्ही करणार आहोत. वर्षभरात जिल्ह्यात सात लाखांहून अधिक लोकांपर्यंत वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून आम्ही पोहचू असे नियोजन केले आहे.आतापर्यंत राज्यातील ३२ जिल्ह्यात माझा दौरा पूर्ण झाला आहे. विकासात्मक आणि संघटनात्मक असा हा दौरा आहे. भाजपा संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सिंधुदुर्गात ५०० प्रवाशी कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. सर्वसामान्य तसेच गरीबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत, लाभार्थ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी ते काम करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांना संपर्क करून आम्ही भाजपशी जोडणार आहोत. 'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार आहे. मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भाजपची सत्ता असलेले सरकार आणू, अशी शपथही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यापुढील काळात प्रचंड ताकदीने भाजप वाढेल. असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे