शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:43 IST

लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी पदाधिकाऱ्यांच्या तालुकावार बैठका

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. ७ मार्च पासून पदाधिकाऱ्यांच्या दौºयाला प्रारंभ झाला. दोडामार्ग ,सावंतवाडी, मालवण असा दौरा करण्यात आला. ८ मार्च रोजी देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकांना भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर उपस्थित होते. तर या संपूर्ण दौºयात सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, यशवंत आठलेकर आढावा घेण्यासाठी अतुल काळसेकर यांच्यासह उपस्थित होते.दरम्यान, भाजपा-शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवरून सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाराजीचा सूर लावला होता.

त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांचीच री ओढत बंड पुकारले होते. त्यानंतर अतुल काळसेकर यांनी खासदार विनायक राऊत यांनी पक्षपाती राजकारण केल्याचा आरोप केला होता. तसेच काळसेकर यांनी युतीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

२०१४ च्या निवडणुकीत राऊत यांच्या विजयात स्वत: काळसेकर, प्रमोद जठार, रत्नागिरीचे बाळ माने यांचा मोलाचा वाटा होता, परंतु राऊत यांनी विजयानंतर सिंधुदुर्ग भाजपाशी कायमच पक्षपाती धोरण अवलंबत विकास निधीसाठी कायमच ठेंगा दाखवला शिवाय कोणत्याही कार्यक्रमांनासुद्धा निमंत्रित केलेले नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात विकास कामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यात विकासकामे आणली असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.एकंदरच युती मधील ताणली गेलेली परिस्थिती, प्रमोद जठार यांनी घेतलेले बंडाचे धोरण पाहता अतुल काळसेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपा काय निर्णय घेणार आणि लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना मदत होणार का? याबाबत जनतेमध्ये औत्सुक्य आहे.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग