भक्ती जामसंडेकरला विजेतेपद
By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T21:03:57+5:302014-11-28T00:14:37+5:30
४0 स्पर्धकांचा सहभाग : आंगणेवाडी येथील राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

भक्ती जामसंडेकरला विजेतेपद
मालवण : आंगणेवाडी येथे श्री भराडीदेवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये सावंतवाडीच्या भक्ती जामसंडेकर हिने विजेतेपद पटकावले. ४० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील द्वितीय ते दहावा क्रमांक प्राप्त स्पर्धकांमध्ये अनुक्रमे अनिकेत असोलकर, मृणाल सावंत व स्नेहल करंबेळकर, नेहा जाधव, ईशा गोडकर, अपूर्वा बांदेकर, सायली राऊळ, अंजुषा बांदेकर, नम्रता परुळेकर व शामली म्हाडेश्वर यांचा समावेश आहे.
यशस्वी सर्व स्पर्धकांना ३० हजार रुपयांची रोख रकमेची पारितोषिके संजय आंगणे यांच्या स्मरणार्थ उद्योजक राजन आंगणे यांनी पुरस्कृत केली होती.
स्पर्धेचे परीक्षण नृत्य दिग्दर्शक हार्दिक शिगले व दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन शांताराम आंगणे यांनी केले.
यावेळी नरेश आंगणे, सतीश आंगणे, डॉ. दिगंबर आंगणे, दत्तात्रय आंगणे, सचिन आंगणे, चंद्रकांत आंगणे, बाबू आंगणे, बाळा आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभाला ज्येष्ठ समाजसेवक व निवेदक मंगेश आंगणे, प्रसाद आंगणे, दिनेश आंगणे, तुषार आंगणे, सचिन आंगणे, कुणाल आंगणे, समीर आंगणे, विनोद आंगणे, सुभाष आंगणे, उत्तम आंगणे, रोहित आंगणे, तनुराज आंगणे, गणेश आंगणे, अक्षय आंगणे, दयानंद आंगणे, आबा आंगणे, जयेश आंगणे, शेखर मराठे, संतोष आंगणे, चंद्रशेखर आंगणे, विद्या आंगणे आदी मान्यवर उपस्थित
होते. (प्रतिनिधी)