शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

भजन हे कोकणच्या घराघरातील श्रद्धेचे प्रतिक

By admin | Updated: August 31, 2015 21:31 IST

संतोष तळेकर : तळेरे भजन मंडळाला अनेक पिढ्यांचा वारसा--आले गणराया

निकेत पावसकर -नांदगाव  -गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा कोकणातील प्रत्येक गावागावात भजनाचे सूर ऐकू येतात. प्रार्थना, भजन, रुपावली, गजर, अभंग, गौळण, भारुड, कव्वाली व गजर यांचे वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण शब्द, रचना अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा असून सध्या संगीत भजनामध्ये बुवा संतोष तळेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्ह््यासह विविध ठिकाणी आपला दबदबा निर्माण केला आहे. तळेरेसह अनेक ठिकाणच्या रात्री या गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या भजन मेळ्यांनी जागू लागतात.गणेशोत्सव आणि भजन मेळे, त्यातील हरीनामाचा गजर हा कोकणातील श्रद्धेचे प्रतिक आहे. गणेशोत्सव काळात तर प्रत्येकाच्या घरी भजनाचे मेळे रंगताना दिसतात. तळेरे येथील संगीत भजनीबुवा संतोष तळेकर यांना तळेरे भजन मंडळाची वाटचाल व त्यांच्या भजन कलेबाबत विचारले असता ते म्हणाले की, वयाच्या बाराव्या वर्षापासून मला भजनाची आवड होती आणि तळेरे गावाला तर फार वर्षांपूर्वीपासूनची भजन परंपरा आहे.संगीत भजनामध्ये मधुकर तळेकर हे सुप्रसिद्ध भजनीबुवा होऊन गेले. त्यापासून सुरु झालेली ही भजन परंपरा आम्ही चालवत आहोत. १९९८ साली मी मुंबईवरुन गावी आलो आणि संगीत भजनाला सुरुवात केली. त्यापूर्वी प्रमोद खटावकर, अविनाश तळेकर हे तरुण भजनीबुवा हे भजन मंडळ चालवत होते. सुप्रसिद्ध भजनीबुवा गुणाजी पाळेकर यांच्यामुळेच मी संगीत भजनाकडे वळलो. त्यांनी संगीत भजनाची गोडी निर्माण केली.ग्रामस्थ व श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या सहकार्यामुळेच आज आमची वाटचाल सुरु आहे. पुढे बोलताना तळेकर म्हणाले की, गणपतीच्या अकरा दिवसात तर आमची सत्तर सत्तर भजने होतात. तरीदेखील वेळ पुरत नाही. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविधर् िठकाणासह रत्नागिरी, गगनबावडा, पाचल, नालासोपारा अशा विविध ठिकाणी हजारो भजने सादर केली. विविध भजन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यशही मिळविले आहे. विविध ठिकाणी रसिक प्रेक्षकांकडून आमच्या संगीत भजनाला मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या असतात. त्याच आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाच्या ठरतात. त्यातही प्रत्येकवेळी आम्ही आमच्या भजनांमधून नवनवीन देण्याचा प्रयत्न करीत असतो. तसा आमचे गुरुवर्य अजित गोसावी यांचाही आग्रह असतो. गणेशोत्सव आणि भजन म्हणजे कोकणी माणसाच्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. हीच भजन कला आम्ही जपली आणि पुढील पिढीही अत्यंत आवडीने त्यात सहभाग घेत आहेत. या सीडीसाठी दर्शन घाडीगावकर (मृदूंगमणी), विकास नर (तबला व ढोलकी), अंकित घाडीगावकर (झांज) असून कोरस म्हणून प्रमोद खटावकर, अनिल मेस्त्री, अमोल सोरप, संतोष मेस्त्री, तुषार तळेकर, प्रणय तळेकर, प्रविण तळेकर, कल्पेश तळेकर, अक्षय तळेकर, तेजस तळेकर, चेतन वरुणकर, संतोष तळेकर यांनी काम केले.तळेरे भजन मंडळाचे संगीत भजन मधुकर तळेकर तर वारकरी भजन पबा खटावकर, पांडुरंग खटावकर, बापू राणे, प्रवीण उर्फ बाळा तळेकर यांच्यासह अनेकांनी चालविले. त्यानंतर मध्यंतरी अविनाश तळेकर व प्रमोद खटावकर यांनी ही भजन परंपरा सुरु ठेवली. त्यानंतर गेल्या चार वर्षापासून मी संगीत अलंकार अजीत गोसावी यांच्याकडे संगीत भजनाचे धडे घेत आहे. या सर्व प्रवासात तरुणांची एक चांगली टीम तयार केली. - संतोष तळेकर, भजनीबुवा तळेरे