शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लावल्या जाताहेत पैजा; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 28, 2024 18:49 IST

महायुती, महाविकास आघाडीमध्ये झाली दुरंगी लढत

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाच टप्प्यांत मतदान घेण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठीची प्रक्रिया संपली आहे. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधी भाजप की मशाल, कोणता उमेदवार विजयी होईल, याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पैजा लावल्या जात आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आणि उद्धवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत झाली आहे. एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी ही लढत दुरंगी असणार आहे. महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या जागेवर आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करण्यात येत आहे.

९ उमेदवार लोकसभेच्या मैदानातरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत या उमेदवारांमध्येच या ठिकाणी थेट लढत होणार आहे.

९,०७,६१८ मतदारांनी बजावला हक्क७ मे रोजी झालेल्या निवडणुकीत ४ लाख ५९ हजार ९९ पुरुष आणि ४ लाख ४८ हजार ५१८ स्त्रिया अशा एकूण ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

अनेकांनी लावल्या पैजारत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात खरी लढत दुरंगी आहे. या लढतीत दोन्ही उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे रत्नागिरीचे नागरिक नेमके कुणाच्या पारड्यात मत टाकतात यावर अनेकांनी पैजा लावायला सुरुवात केली आहे.

मतदार कोणाच्या पाठीशी?नारायण राणे : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजप की शिंदेसेना या दोघांमध्ये उमेदवारीवरून शेवटपर्यंत रस्सीखेच होती. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली आणि ते महायुतीचे उमेदवार झाले. त्यामुळे त्यांच्या पाठीशी लोक उभे राहतात काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.विनायक राऊत : मागील दोन टर्म खासदार असलेले उद्धवसेनेचे सचिव विनायक राऊत यांना निवडणुकीच्या आधीच दोन महिने तिकीट जाहीर झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, राणे आणि राऊत यांच्यात आता कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत