शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:34 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास ...

ठळक मुद्देआचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ?जिल्ह्यात अनेक वाड्या तहानलेल्या ;जिल्हाधिकारी प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास टाळले होते. २३ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी देणार का ? असा प्रश्न तहानलेल्या नागरिकांतून विचारला जात आहे.खरं तर आरोग्य व पाणी या विषयासाठी आचारसंहितेचे कोणतेच बंधन नसते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, यावेळी प्रथमच जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त असताना या कामांना मंजुरी देण्याचे टाळले आहे. याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती.

१६ मे रोजी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची संयुक्त भेट घेऊन पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी देण्यास विनंती करण्याचे ठरले होते.

आता जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 'पाणी टंचाईची कामे मंजूर केल्याने मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार' आहे, हे सुद्धा आता होणार नाही. त्यामुळे किमान आतातरी प्रशासनाने पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी तहानलेल्या ग्रामस्थांतुन होत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग