शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:19 IST

Kankavli, highway, Pwd, Sindhudurgnews कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे .

ठळक मुद्देबॉक्सेल ब्रिजचा वरील भाग हटविण्यास सुरुवातउड्डाणपुलासाठी ४० कोटींचा खर्च प्रस्तावित

कणकवली : कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे .याबाबत नगरपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत हा भाग हटवून याठिकाणी नवीन बॉक्सेल करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे महामार्ग ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले होते . मात्र , त्याला आमदार नीतेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विरोध करून तेथे उड्डाणपुल करण्याबाबत आग्रही मागणी केली होती .

दरम्यान, या बॉक्सेल ब्रिजच्या वरील भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज कोसळला होता. त्या वरील बाजूचा सिमेंट काँक्रीट रस्ता ब्रेकर द्वारे तोडण्यात येत आहे . वरील काही भाग ब्रेकर द्वारे कट करण्यात आला असून , उर्वरित भाग लवकरच काढण्यात येणार आहे.बॉक्सेल ब्रिजच्या वरील भागात अनेक ठिकाणी उभ्या भेगा गेल्या असून, कोसळलेल्या ठिकाणाहून एस. एम हायस्कूलच्या अंडरपास पर्यंतचा पूर्णच काँक्रीट रस्ता काढून त्याजागी नव्याने रस्ता करावा लागणार आहे.

नगरपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत आताच्या बॉक्सेल ब्रिज असलेल्या भागात उड्डाणपुलासाठी ४० कोटींचा खर्च प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप तेथील उड्डाणपुलाला मंजुरी नसल्याने बॉक्सेल ब्रिजचा संपूर्ण भाग काढणार की फक्त एस. एम. हायस्कूल पर्यंत भाग काढून काम उरकले जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे .कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजचा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे . 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली