बाप्पा पोहोचले सातासमुद्रापार...

By Admin | Updated: September 30, 2015 00:10 IST2015-09-29T21:40:25+5:302015-09-30T00:10:06+5:30

खेडच्या तरूणांचा आदर्श : ओमानमध्ये साजरा झाला गणेशोत्सव

Bappa reached Satasamprasar ... | बाप्पा पोहोचले सातासमुद्रापार...

बाप्पा पोहोचले सातासमुद्रापार...

खेड : ओमान देशात काम करणारे खेड तालुक्यातील २५ तरुण गणेशोत्सव साजरा करीत आहेत. कामानिमित्त ओमानमध्ये राहत असलेल्या या तरूणांचा आदर्श तालुक्यातील स्थानिक तरूणांना आदर्शवत तर आहेच, शिवाय कोकणातील गणेशोत्सवाचा हा आदर्श सातासमुद्रापार असलेल्या अनेक कोकणवासीयांनी घेतला आहे. अनंत चतुर्दशी दिनी या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्याचे या तरुणांनी ओमानमधून सांगितले आहे.‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात कोकणातील बाप्पांच्या या भक्तांना गणपतीचे किती आकर्षण आहे, हे सांगण्याची गरज नाही. तसे ते सलग १० दिवस या बाप्पांचा पाहुणचार करीत असतात. कोकणवासीयांचे या बाप्पांवरील प्रेम आणि भक्ती अवघ्या गणेशभक्तांना भुरळ घालते. आबालवृध्दांसह लाखो भक्तगण या गणेशाच्या आगमनाचे स्वागत करतात, तसे ते निरोपाचेही स्वागत करतात. कोकणातील श्री गणेशाचे पूजन करतानाच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे अनमोल दर्शन ओमान देशातही घडले आहे. तरुणांच्या या आगळ्यावेगळ्या संस्कारांचे म्हणून कोकणवासीयांना आकर्षण आहे.
दापोली तालुक्यातील माळण गावचे अनंत नाडुरकर, प्रकाश म्हापलकर (करंजाळी ता. दापोली), हरिश्चंद्र मुंडेकर (सोगनाव, ता. खेड), प्रवीण निवळकर (संगलट, ता. खेड), मनोहर नाचरे (भडवळे, ता. खेड), संदीप पावसकर (भडवळे, ता. खेड), समीर उदेग (शिव, ता. खेड), सुनील भुवड (सवणस, ता. खेड), सुरेश कोकाटे आणि प्रमोद जगदाळे (नांदगाव, ता़ खेड), भागोजी रांगले (सवणस, ता. खेड), मोहन अांब्रे (गुणदे, ता. खेड), दशराथ मालप (अणसपुरे, ता. खेड) आणि विलास नाचरे (पोफळवणे, ता. खेड) हे सर्व तरूण ओमान येथील अल तुर्की कंपनीत काम करीत आहेत. नवतरूण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ओमान अल तुर्की कंपनी असे या गणेशोत्सवाचे नाव आहे. गेली २० वर्षे हे लोक ओमानमध्ये काम करीत आहेत.
मात्र, कोकणातील श्री गणेशोत्सवाला सर्वांनाच गावाला येण्याची संधी मिळत नसल्याने तेथेच एक छोटेसे मंडळ स्थापन करून गेल्या १0 वर्षांपासून ओमानमध्ये ते राहत असलेल्या घरामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहेत. सातासमुद्रापार हा उत्सव साजरा करणे जेवढे कठीण आहे. तेवढ्याच श्रध्देने आणि भक्तीने गणेशाचे मनोभावे पूजन केल्यास गणेशदेखील त्यामध्ये येणारे प्रत्येक विघ्न दूर करतो. याचा अनुभव या तरूणांनी ओमान देशात घेतला आहे. त्यांच्या या वैविध्यपूर्ण कार्याने कोकणवासीयांची मान अभिमानाने उंचावते हेदेखील तितकेच खरे आहे. (प्रतिनिधी)

कोकणातील गणेशोत्सवाचा आदर्श ओमानमध्ये.
संस्कृती आणि संस्कारांचे अनमोल दर्शन.
दापोली, खेडमधील तरूणांचा सहभाग.
सलग १० दिवस बाप्पांचा पाहुणचार.

Web Title: Bappa reached Satasamprasar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.