शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली येथील प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपीला जामीन मंजूर

By सुधीर राणे | Updated: May 10, 2024 15:47 IST

कणकवली: कणकवली, सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पुर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील, ...

कणकवली: कणकवली, सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पुर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील, माऊलीनगर येथील महेंद्र गोपाळ चव्हाण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. १० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील माऊलीनगर येथील नागवे रोडवर तक्रारदार गौमत हिंदळेकर हा मित्र अल्पेश तांबेसह दुचाकीने ट्रॅव्हल बुकींगचे पैसे आणण्यासाठी जात होता. यावेळी घटने पूर्वीच्या पुर्ववैमनस्यातून समोरून गाडीतून आलेल्या आरोपी महेंद्र गोपाळ चव्हाण याने हुल दिली. यामुळे तक्रारदार व साक्षीदार गाडीसह खाली पडले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या खिशातील रेडियम कटरने गौतम हिंदळेकर याच्या १९ घातक वार केले होते. याप्रकरणी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीही उपचारार्थ रुग्णालयात असल्याने १३ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर आरोपी सावंतवाडी करागृहात होता. दरम्यान, त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव आणू नये. सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय