सिंधुदुर्गात जनक्रांती मशाल :हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:59 PM2020-12-05T17:59:56+5:302020-12-05T18:01:46+5:30

Divyang, sawantwadi, sindhudurgnews सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती व महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर रोजी जनक्रांती मशाल जिल्हाभर फिरवून हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे, असा निर्धार अपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत करण्यात आला.

Awareness in the district by setting up a people's movement against installment fraud | सिंधुदुर्गात जनक्रांती मशाल :हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती

सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती व महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना यांच्यावतीने जागतिक अपंगदिन साजरा करण्यात आला.

Next
ठळक मुद्देहप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृतीअपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत निर्धार

सावंतवाडी : सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती व महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर रोजी जनक्रांती मशाल जिल्हाभर फिरवून हप्तेखोरी विरूध्द जनआंदोलन उभारून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे, असा निर्धार अपंगदिनी दिव्यांग निराधार व विधवा महिलांच्या बैठकीत करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग निराधार विधवा महिलांनी एकत्र येत जागतिक अपंगदिन साजरा केला. यावेळी सर लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दिव्यांग निराधार विधवा महिलांची बैठक सावंतवाडी नागरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचे हरी गावकर, जिल्हा भ्रष्टाचार शोध समितीचे जिल्हाध्यक्ष सत्यवान शेडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी हरिश्चंद्र राऊळ, समीर गवंडे, सुरेश दामले, विठ्ठल शिरोडकर, लता चव्हाण, विजय वाडकर, माधुरी मेस्त्री, शकुंतला पणशीकर, आत्माराम परब, जयेंद्रथ राऊळ, भरत झाटये, बाळकृष्ण आरोलकर, सुरेखा शिरोडकर आदी दिव्यांग निराधार महिला उपस्थित होत्या.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध भेसळयुक्त खाद्यपदार्थ, औषधे, गुटखा, भेसळ दारू, ड्रग्स अंमली पदार्थ, भेसळ सॉफ्ट ड्रींक्स यांची राजरोस विक्री संबंधित अधिकाऱ्यांना हप्ते देऊन जिल्ह्यात सुरू आहे.

एकामागोमाग एक अस हृदयविकार, कर्करोग, ब्रेन ट्युमर, लिव्हर डॅमेज, दारूच्या नशेत होणारे अपघात यामुळे मृत्यु मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढीस लागलेली असताना वरील सर्व पदार्थांची हप्ते देऊन जिल्ह्यात विक्री केली जात आहे. या विरोधात ढोल बजाओ, घंटानाद अशी आंदोलने करून देखील जिल्ह्यातील जीवघेणे अवैध भेसळ व्यवसायात कोणती कारवाई हप्तेखोर अधिकारी करीत नाहीत.

 

Web Title: Awareness in the district by setting up a people's movement against installment fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.