कुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 03:10 PM2021-05-05T15:10:42+5:302021-05-05T15:12:14+5:30

CoronaVirus Kudal Sindhudurg : कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्राधान्याने ॲग्रिकल्चर कॉलेज येथे, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे, बॅरिस्टर नाथ पै येथे, तसेच अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेड्‌सचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Availability of 300 beds in Kudal taluka, information of Sanjana Sawant | कुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती

कुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती

Next
ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाने घाबरून जाऊ नये

ओरोस : कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्राधान्याने ॲग्रिकल्चर कॉलेज येथे, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे, बॅरिस्टर नाथ पै येथे, तसेच अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेड्‌सचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

कुडाळ तालुक्यातील कोविड सेंटर्सची यादी व उपलब्ध बेड्‌सची संख्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा संजना सावंत यांनी देतानाच, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवा देण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही दिली आहे. याबाबतचे पूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्या देखरेखीखाली झालेले आहे.

उर्वरित जिल्ह्यात तालुकानिहाय जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे नियोजन करून १२०० अतिरिक्त बेड्‌स उपलब्ध करून ठेवणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने निश्चित केलेले आहे. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेणे, तसेच त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत देखरेख ठेवणे, नियमित तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन सुविधा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जेणेकरून रुग्णांवर योग्य उपचार होतील व या आजारातून लवकर बाहेर येण्यास मदत होईल. याबाबत कुडाळ तालुक्यातील खासगी डॉक्टर यांना देखील विनंती करून, त्यांनीही आपली सेवा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना विनंती आहे की, आपल्याकडे तपासणीसाठी येणारे सापाचे रुग्ण यांना आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रेफर करावे. सिम्प्टम्स असणाऱ्या व्यक्तींना हे कीट प्राधान्याने वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.

निदान लवकर झाल्याने प्रसार रोखता येणार

ज्या गावात, वाड्यात, वस्त्यांमध्ये किंवा घरामध्ये दहापेक्षा अधिक संशयित रुग्ण असल्यास, संबंधित व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्या ठिकाणापर्यंत मोबाईल ॲम्ब्युलन्स सेवा पथक पाठवून संशयित रुग्णाचे स्वॅब घेता येतील. त्यामुळे संबंधित कुटुंबाला टेस्टिंगसाठी प्रवास करावा लागणार नाही. तसेच तातडीने स्वॅब घेतल्याने रिपोर्ट पण लवकर घेऊन उपचार करणे देखील सोपे होणार आहे. यामुळे करोना रुग्णाचे निदान लवकर झाल्यामुळे पुढील प्रसारदेखील रोखता येणार आहे.

Web Title: Availability of 300 beds in Kudal taluka, information of Sanjana Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.