आॅटो रिक्षा परवान्यांचे वाटप होणार

By Admin | Updated: July 8, 2015 21:42 IST2015-07-08T21:42:39+5:302015-07-08T21:42:39+5:30

अर्ज करण्याचे आवाहन : नवे परवाने देणार आॅनलाईन : बिडकर

Auto rickshaw license will be allocated | आॅटो रिक्षा परवान्यांचे वाटप होणार

आॅटो रिक्षा परवान्यांचे वाटप होणार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील १७५ उमेदवारांना आॅटो रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात येणार असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी १४ आॅगस्ट २०१५ पर्यंत आपले इरादापत्र (अर्ज) संबंधित कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.
व्यापगत झालेले रिक्षा परवाने रद्द करून त्याऐवजी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारांची निवड करून नव्याने रिक्षा परवाने देण्याची कार्यवाही राज्यभर सुरू आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९०३ उमेदवारांना परवाने देण्यात येणार आहेत. त्यापैकी १२५ उमेदवारांना रिक्षा परवाने देण्यात आलेले आहेत.
आता प्रतीक्षा यादीतील अनुक्रमे १२६ ते ३०० पर्यंतच्या १७५ उमेदवारांना रिक्षा परवाने देण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी १४ आॅगस्टपर्यंत नवीन आॅटोरिक्षा परवाना इरादापत्रासाठी सर्व कागदपत्रे सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील १२५ व आज नव्याने १७५ रिक्षा परवाने देण्यात येणार असून एकूण ३०० उमेदवारांच्या रिक्षा परवान्यांचा प्रश्न मिटला आहे, तर उर्वरित ६०३ परवाने देण्यासाठी शासनाचे आदेश प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

दिलेल्या मुदतीत इरादापत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधितांनी कार्यालयात जमा न केल्यास संबंधितांना आॅटोरिक्षा परवान्यांची गरज नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- किरण बिडकर
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग

मागील १२५ व आज नव्याने १७५ रिक्षा परवाने देण्यात येणार आहेत.
एकूण ३०० उमेदवारांच्या रिक्षा परवान्यांचा प्रश्न मिटला आहे.
उर्वरित ६०३ परवाने देण्यासाठी शासनाचे आदेश प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Auto rickshaw license will be allocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.