शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली बोट दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल, मृत्यूचा ठपका ठेवत सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:41 IST

बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही जणांना तत्काळ अटकही करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : पर्यटन हंगाम सुरू असतानाच मालवणमधील तारकर्ली येथे काल, मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघां जणांचा मृत्‍यू झाला. या दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही जणांना तत्काळ अटकही करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय ३६, रा.अणाव-कुडाळ) यांनी दिली आहे.या घटने प्रकरणी बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (२३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (५४, रा. देवबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नरळे हे करीत आहेत. तारकर्लीच्या समुद्रात काल मंगळवारी स्कुबाडायव्हिंग बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल, मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.तारकर्ली समुद्रात बोट उलटून घडलेल्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. काल, सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी