शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:54 IST

मालवण : क्षुल्लक कारणावरून महेश गोविंद मालंडकर (३५) रा. तोंडवळी तळाशिलवाडी यांना तेथीलच विश्वनाथ सोनदेव खवणेकर (६२) याने कोयत्याने ...

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने हल्लातोंडवळीतील घटना : एक जखमी; गुन्हा दाखल

मालवण : क्षुल्लक कारणावरून महेश गोविंद मालंडकर (३५) रा. तोंडवळी तळाशिलवाडी यांना तेथीलच विश्वनाथ सोनदेव खवणेकर (६२) याने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना काल रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्वनाथ खवणेकर याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, विश्वनाथ खवणेकर यानेही महेश मालंडकर, हरी मालंडकर, नारायण मालंडकर या तिघांविरोधात थापटाने मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी-तोंडवळी तळाशिलवाडी येथे राहणारे महेश गोविंद मालंडकर यांच्याकडे विश्वनाथ खवणेकर यांचा मुंबईत वास्तव्यास असणारा चुलतभाऊ लक्ष्मण खवणेकर हा राहत असल्याच्या रागातून विश्वनाथ खवणेकर याने काल रात्री दारूच्या नशेत महेश मालंडकर यांच्या डोक्यावर, नाकावर व हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याला स्थानिक ग्रामस्थ व मित्रांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.महेश मालंडकर याने दिलेल्या तक्रारीनुसार विश्वनाथ खवणेकर याच्याविरोधात कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमी असलेल्या महेश मालंडकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गलोले हे करत आहेत.तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखलविश्वनाथ खवणेकर याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आपला चुलत भाऊ हा मुंबईवरून आल्यावर महेश मालंडकर यांच्याकडे राहतो. महेश मालंडकर हा आमच्या भावडांमध्ये भांडणे लावून देतो. काल रात्री महेश मालंडकर हा माझ्या घरासमोरच्या अंगणात उभे राहून टोमणे मारत होता. याबाबत विचारणा केली असता महेश मालंडकर, हरी मालंडकर, नारायण मालंडकर या तिघांनी आपल्याला हाताच्या थापटाने मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली असे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग