क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता अॅथलेटिक्स संघ जाहीर
By Admin | Updated: November 14, 2014 00:14 IST2014-11-14T00:11:37+5:302014-11-14T00:14:34+5:30
सावंतवाडी : पुणे - बालेवाडी येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता

क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता अॅथलेटिक्स संघ जाहीर
सावंतवाडी : पुणे - बालेवाडी येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या संघाची निवड करण्यात आली आहे.
या संघात निवड झालेल्या खेळाडमध्ये १६ वर्षांखालील मुले-शिवम बबल घोगळे (वेंगुर्ले), विठ्ठल संतोष चौगुले (मळगाव). १६ वर्षांखालील मुली-संजना सावाजी गावकर (मळगाव). १८ वर्षांखालील मुले-सिध्देश कृष्णा मिरकर (कसाल), दर्शन सीताराम लाड (नेमळे), १८ वर्षांखालील मुली-अंकिता अजित परब (वेंगुर्ले).
२० वर्षांखालील मुले-संकेत प्रकाश बागाईतकर (नेमळे), सुशांत दशरथ राऊळ (सावंतवाडी), समीर मंगेश जाधव (कणकवली). खुला गट-अभिषेक जयवंत गावडे (वेंगुर्ले), वैभव सीताराम घोगळे (नेमळे) यांचा समावेश आहे. ही निवड संजय मालवणकर व सुरेंद्र बांदेकर यांनी केली. सर्व स्पर्धकांना अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा संघ १४ रोजी पुणे येथे रवाना होणार असून, संघ व्यवस्थापिका म्हणून माधुरी खराडे (ओरोस) यांची नियुक्ती केली आहे. (वार्ताहर)