विधानसभा निवडणूक : विक्रमी मतदानाची अपेक्षा

By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T22:13:20+5:302014-10-14T23:22:49+5:30

रत्नागिरीत अडीच लाख मतदार.

Assembly election: Expectation of record turnout | विधानसभा निवडणूक : विक्रमी मतदानाची अपेक्षा

विधानसभा निवडणूक : विक्रमी मतदानाची अपेक्षा

रत्नागिरी: राष्ट्रवादीच्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजकीय पक्षांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून काढल्यानंतर आता सर्वच उमेदवारांच्या परीक्षेची वेळ आली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ६५ हजार २७९ एवढे मतदार असून, उद्या (दि. १५) मतदानाच्या निमित्ताने होणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षेचा निकाल येत्या १९ आॅक्टोबरला लागणार आहे. प्रत्यक्षात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी चार प्रमुख पक्षात ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मतदानासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात एकूण १६६७ मतदान केंद्र असून, सर्वत्र निवडणूक अत्यंत शांततेत व्हावी, कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेतली आहे. तसेच या मतदारसंघात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आठ गट तसेच संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील एक जिल्हा परिषद गट अशा एकूण ९ गटांचा या मतदारसंघात समावेश आहे. रत्नागिरी मतदारसंघ या निवडणुकीत संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ११ उमेदवार रत्नागिरी विधानसभा मतदार संघातच उभे आहेत.
निवडणुकीच्या मतदानासाठी १३ व १४ आॅक्टोबरला मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. रत्नागिरीजवळच असलेल्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे मतदान यंत्र कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली असून निवडणूक अधिकारी व कर्मचारी एस. टी. बसेसमधून मतदारसंघातील मतदान केंद्रात पोहोचले आहेत. सकाळच्या सत्रात डॉ. आंबेडकर न्याय भवनात कर्मचाऱ्यांची जोरदार धावपळ सुरू होती.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ३४१ मतदान केंद्रातील ३४ विभागाकरिता राखीवसह ३८ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे तर ३७५ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी वर्ग १ ते ३साठी ११२५ कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ३७५ कर्मचारी असे एकूण १९१३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून उर्वरित टीम मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सायंकाळपर्यंत तपासणी केलेली मतदान यंत्रे यांच्यासह बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी रवाना झाली आहे. बुधवारी प्रथम मतदान यंत्रांची चाचणी घेऊन मगच मतदानाला सुरूवात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

नावपक्ष
उदय सामंतशिवसेना--रमेश कीरकाँग्रेस--दिनेश पवारबसपा--बशीर मुर्तुझाराष्ट्रवादी--सुरेंद्र तथा बाळ मानेभाजप--प्रवीण जाधवबहुजन मु. पार्टी--उदय सामंतशिवसेना -मनिष तळेकरअपक्ष--नंदकुमार मोहितेअपक्ष--सुनील सुर्वेअपक्ष--संदीप गावडेअपक्ष
मतदारसंघात एकूण १६६७ मतदान केंद्र.
रत्नागिरीतील आठ गट व संगमेश्वरातील एक जिल्हा परिषद गट अशा एकूण नऊ गटांचा मतदारसंघात समावेश.
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी व कर्मचारी दाखल.



उमेदवार 11  --मतदान केंद्र  1667

दापोली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण
दापोली  एकूण मतदार २,६३,८८१

नाव पक्ष सूर्यकांत दळवीशिवसेना , केदार साठेभाजप , शशिकांत धाडवेस्वाभिमान ब. संघ
आदम चौगुलेबहुजन मु. मोर्चा ,वैभव खेडेकरमनसे ,संजय कदमराष्ट्रवादी ;;अ‍ॅड. सुजित झिमणकाँग्रेस ,,किशोर देसाईअपक्ष
दयानंद कांबळेबसपा ,,प्रदीप गंगावणेअपक्ष

दहा उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रबंद --सावंतवाडी मतदारसंघ : महाराष्ट्रभरात चर्चेला ठरलेली निवडणूक

नावपक्ष
बाळा गावडेकाँग्रेस --दीपक केसरकरसेना --राजन तेली भाजप --सुरेश दळवी राष्ट्रवादी कॉँग्रेस  --परशुराम उपरकरमनसे
किशोर लोंढे अपक्ष --अजिंक्य गावडेअपक्ष --उदय पास्तेअपक्ष

कणकवलीत सुरक्षा यंत्रणा सज्ज

नावपक्ष
प्रमोद जठारभाजपा --नितेश राणेकाँग्रेस -सुभाष मयेकर शिवसेना --अतुल रावराणे राष्ट्रवादी कॉँग्रेस  --डॉ. तुळशीराम रावराणेशेकाप - चंद्रकांत जाधव बसपा --विजय कृष्णाजी सावंतअपक्ष -विजय श्रीधर सावंतअपक्ष

कणकवली
एकूण मतदार २,२३, ९१०

सव्वादोन लाख मतदार ठरवणार आमदार
गुहागर मतदारसंघ : सीआरएफच्या जवानांचाही कडेकोट बंदोबस्त

नाव पक्ष
भास्कर जाधवराष्ट्रवादी --डॉ. विनय नातूभाजप --संदीप सावंतकाँग्रेस --सुरेश गमरेबसपा --विजयकुमार भोसलेशिवसेना

कुडाळ मतदारसंघात प्रशासन सज्ज

नाव पक्ष
नारायण राणेकाँग्रेस --वैभव नाईकसेना -पुष्पसेन सावंत राष्ट्रवादी -विष्णू मोंडकर भाजपा

Web Title: Assembly election: Expectation of record turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.