शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डांबर कमी, खड्डे जास्त, सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील विलवडेतील स्थिती, बांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:30 IST

ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शासनाचे वेळकाढू धोरण आणि ठेकेदारांना दरवर्षी दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अशी परंपरा गेली पाच वर्षे सुरू आहे.दरवर्षी पावसानंतर या ...

ठळक मुद्देबांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबानखड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी, पावसाळ्यात परिस्थिती पुन्हा जैसे थैपूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांतून मागणी

ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शासनाचे वेळकाढू धोरण आणि ठेकेदारांना दरवर्षी दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अशी परंपरा गेली पाच वर्षे सुरू आहे.

दरवर्षी पावसानंतर या मार्गावर काळ्या डांबराची लाल माती होते. चर-खड्डे तर रोजच्या प्रवासातील एक भाग झाले आहेत. ग्रामस्थांचा रोष ओढवला की खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पावसाळ्यात परिस्थिती पुन्हा जैसे थै. त्यामुळे या मार्गाचे सक्षमरित्या डांबरीकरण होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होत आहे.

बांदा-दाणोली मार्गाचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. जवळपास १५ कोटीहून अधिक निधी त्यासाठी खर्ची घालण्यात येणार होता. यामध्ये सरमळे, बावळाट, दाणोली तसेच वाफोली-बांदा या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरण झाले. पण विलवडे येथील सुमारे तीन ते चार किलोमीटरचा पट्टा रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामस्थांच्या समाधानासाठी दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जातात. मात्र रूंदीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग