शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

असनिये धबधबा बनतोय पर्यटकांचे आकर्षण, गोव्यासह बांदा, सावंतवाडीवासीयांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:42 IST

हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्यावर गर्दी होत असून निसर्ग सहलीसाठी या ठिकाणाची निवड होत आहे.

ठळक मुद्देअसनिये धबधबा बनतोय पर्यटकांचे आकर्षण, गोव्यासह बांदा, सावंतवाडीवासीयांची पसंती स्थानिकांच्या हाताला मिळतोय रोजगार

संदेश कोलतेसावंतवाडी : हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्यावर गर्दी होत असून निसर्ग सहलीसाठी या ठिकाणाची निवड होत आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असनिये गाव निसर्ग सौंदर्यासाठी व वन्यजीवांच्या वस्तीसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीचे डोंगर, गर्द हिरवेगार जंगल, माड, पोकळीची झाडे, नैसर्गिक जलस्त्रोत, दारूबंदी यासाठी असनिये गाव प्रसिद्ध आहे. या सर्वात असनिये गावच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेल्या कणेवाडी धबधब्यामुळे गेली काही वर्षे असनिये गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.

असनियेहून घारपीचा प्रवास सुरू झाल्यावर कणेवाडी येथील घाटमार्गात समोर मनाला थक्क करणारा हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा धबधबा दृष्टीस पडतो. कोसळणारा पाऊस, धुक्याची झालर व दुसऱ्या बाजूने ताठ मानेने दौलत उभी असलेली सह्याद्रीची रांग सारे काही मनाला थक्क करून जाते. हा धबधबा सह्याद्री पर्वतरांगांच्या अवघड भागात असल्याने तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्याजवळ पोहोचणे आव्हानात्मक ठरते.गोवा, दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी तसेच आंबोली या शिवाय वर्षापर्यटनाची अन्य ठिकाणे शोधणारे पर्यटक या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. गावातील धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने गावातील ग्रामस्थांच्या हाताला हंगामी रोजगार मिळाला आहे. गावातील महिला बचत गटाच्यावतीने तसेच इतर ग्रामस्थांनी पर्यटकांच्या सोयीसाठी जेवण व नाश्त्याचे स्टॉल उभारले असून ग्रामस्थांच्या हाताला यातून हंगामी रोजगार मिळाला आहे.धबधब्याकडे असे जाधबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बांदामार्गे डेगवे-तांबोळी असा १३ किलोमीटरचा तर सावंतवाडी, ओटवणे तांबोळीमार्गे २२ किलोमीटरचा व दोडामार्ग तळकटमार्गे ३२ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. तेथून निमुळत्या पायवाटेने धबधब्याजवळ जाता येते. मात्र, हे सगळे अडथळे पार करून धबधब्याजवळ पोहोचल्यास पर्यटनाचा आनंद मिळतो. साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची पसंती या धबधब्याला मिळत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग