शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: गावपळणीसाठी शिराळे निर्मनुष्य!, दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:06 IST

गावकुसाबाहेर सडुरेत राहुट्यांची उभारणी : कडाक्याच्या थंडीतही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह

वैभववाडी : शिराळेवासियांनी गुरे-ढोरे, पाळीव प्राणी, पक्ष्यांसह बुधवारी (दि. ८) सायंकाळी गाव सोडला. त्यामुळे निर्मनुष्य झालेले गाव सुनेसुने झाले आहे. ‘वार्षिक गावपळण’ सुरू झाल्याने पुढचे चार-पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरेतील दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे. सध्या कडाक्याची थंडी असली, तरी पूर्वजांनी सुरू केलेल्या वार्षिकासाठी गाव सोडताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.साडेचारशे वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा आताही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या  या गावपळणीबद्दल अनेकांना कुतूहल आणि उत्सुकता आहे. एरव्ही शांत असणाऱ्या गर्द वनराईने नटलेला हा परिसर शिराळेवासीयांच्या आगमनाने गजबजून गेला आहे. गावकऱ्यांनी सोबत आणलेल्या गुरा-ढोरांचेही वास्तव्य तेथेच असणार आहे. शाळा, अंगणवाडीही येथेच भरते. त्यामुळे एरव्ही ‘चार भिंतींच्या आत’ शिकणाऱ्या चिमुकल्यांना उघड्यावर निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यासाचे धडे गिरवण्याचा आनंद लुटायला मिळतो.आठवडाभर पुरेल इतक्या शिदोरीचे गाठोडे डोक्यावर घेऊन गावकऱ्यांनी दुपारी ३ वाजल्यापासून राहुट्यांच्या दिशेने प्रवास सुरू केला. कुटुंबातील कर्ती माणसे पाळीव प्राणी, पक्षी घेऊन राहुट्यांच्या दिशेने निघाले. तर वयोवृद्ध, लहान मुले व महिलांनी साहित्य घेऊन ‘एसटी बस’ने वास्तव्याचे ठिकाण गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी आल्यामुळे राहुट्यांचा परिसर गजबजून गेला असून, एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, पुण्यातील गावकरी मंडळी होणार सामीलशिराळेच्या वार्षिक ‘गावपळण’ प्रथेबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र, सध्याच्या पिढीकडून गावपळणीबद्दल विविध मतप्रवाह ऐकायला मिळत असले, तरी या गावपळणीला आता उत्सवाचे रूप येऊ लागले असून, गावकरी मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी करतात. या काळात मुंबई, पुण्यासह विविध शहरांत गेलेली गावकरी मंडळीही या कालावधीत गावपळणीत सामील होत आहेत.

शिराळेच्या गावपळणीचे परराज्यातही कुतूहलशिराळेची वार्षिक गावपळण संपूर्ण राज्यासह लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गावपळणची पद्धत आणि रितीरिवाज पाहायला दरवर्षी विविध भागांतून लोक येत असतात. जिल्ह्यातील विविध संस्था, अभ्यासक याठिकाणी भेट देऊन ही प्रथा, परंपरा कशी सुरू झाली? त्यानंतर होत गेलेला बदल, आताच्या पिढीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदींचा मागोवा घेत असतात.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी