शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:19 IST

कुंडमळातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

ओरोस : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला असून, नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८१३ साकव असून त्यापैकी १६९ सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जे साकव नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी हा साकव नागरिकांनी वापरू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. खेबुडकर म्हणाले की, रविवारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील दुर्घटनेची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला. नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याचे तसेच नादुरुस्त साकवांचा वापर होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साकवांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वाचा - धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश १७५ साकव नव्याने  बांधले जाणारसद्य:स्थितीत जिल्ह्यात ८१३ साकव आहेत. यांपैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त आहेत.  १३८ साकव निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन साकव बांधले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आणखी १७५ साकव नव्याने बांधले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.नवीन साकवांसाठी ९७ कोटी आवश्यक४०६ नादुरुस्त साकव वगळून निर्लेखित झाकलेले नाही. नव्याने बांधण्यात येणाऱ्या साकवांसाठी तब्बल ९७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याशिवाय आणखी ३३७ ठिकाणी नव्याने साकव बांधण्याची मागणी प्रशासनाकडे आलेली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी दिली.‘त्या’ ठिकाणी फलक लावणारजिल्ह्यातील ४०६ साकव नादुरुस्त आहेत. यातील काही साकव अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे या नादुरुस्त साकवांच्या ठिकाणी नागरिकांनी साकवाचा वापर करू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याचेही  खेबुडकर यांनी सांगितले.