शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अरुणासाठी समिती गठीत, मंत्रालयातील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:18 IST

अरुणा प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा सदस्यीय समिती मंत्रालयातील बैठकीत गठीत करण्यात आली. या समितीने येत्या सात दिवसांत पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

ठळक मुद्देअरुणासाठी समिती गठीत, मंत्रालयातील बैठकीत निर्णय ७ दिवसांत अहवाल देण्याची राज्यमंत्री बच्चू कडूंची सूचना

वैभववाडी : अरुणा प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा सदस्यीय समिती मंत्रालयातील बैठकीत गठीत करण्यात आली. या समितीने येत्या सात दिवसांत पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी राज्यमंत्री कडू यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव चेहल, कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक हमीद अन्सारी, मुख्य अभियंता एस. एस. तिरमनवार, माजी आमदार पुष्पसेन सांवत, प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, दीपक पांचाळ, प्रकाश मोरे, अजय नागप, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.अरुणा प्रकल्पग्रस्तांनी गेल्या आठवड्यात मंत्री कडू यांची भेट घेऊन अन्याय होत असल्याची कैफियत मांडली होती. त्याचवेळी कडू यांनी अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी राज्यमंत्री कडू यांच्या दालनात सभा झाली. या सभेत पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे झालेले काम, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीवर प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी आक्षेप घेतला.

प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी यांच्या माहितीत तफावत जाणवल्यामुळे राज्यमंत्री कडू यांनी प्रकल्प आणि पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी समिती गठित करीत असल्याचे स्पष्ट केले.या समितीत जलसंपदा विभागाचे तीन, महसूल विभागाचे तीन अधिकारी आहेत तर उर्वरित सहा सदस्य हे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी असणार आहेत. या समितीने प्रकल्प आणि पुनर्वसनाच्या सद्यस्थितीचा अहवाल पुढील सात दिवसांत द्यावा, अशी सूचना मंत्र्यांनी केली आहे...तर  त्या कामांचे चित्रीकरण करावेसमितीने पाहणी करण्याअगोदर पाटबंधारे विभागाला धरणाचे किंवा पुनर्वसनाचे काम करावयाचे असेल तर त्या कामांचे चित्रीकरण करण्यात यावे,अशी सूचनासुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना केली. पाहणी समितीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूsindhudurgसिंधुदुर्ग