शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

चाकू सुऱ्याचा धाक दाखवून चोरी, कर्नाटकातील चोरटे ओरोस येथे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:53 IST

चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापूर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देचाकू सुऱ्याचा धाक दाखवून चोरीकर्नाटकातील चोरटे ओरोस येथे जेरबंद

ओरोस : चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापूर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.४ मार्च रोजी मध्यप्रदेश-धार येथील सराईत गुन्हेगारांनी रात्री यल्लापूर (कर्नाटक) येथील एका व्यक्तीला चाकू सुºयाचा धाक दाखवून रोख रक्कम १ लाख रुपये व सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केली होती. तसेच चारचाकी घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी यल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुह्याची आणि दुचाकी चोरीची कल्पना येथील पोलीसदलाला दिली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. या आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली होती. तसेच ओरोस जिजामाता चौक येथे महामार्गावर अचानक नाकाबंदी करून तपासणी केली असता पावणे पाचच्या सुमारास निळ्या काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीने दोन व्यक्ति संशयितरित्या प्रवास करताना या एलसीबीच्या पथकाला दिसून आला. त्यांना थांबण्याचा ईशारा पोलिसांनी केला असता त्यांनी दुचाकी तेथेच टाकून पळण्याचा प्रयत्न केला.मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत त्यांना तेथेच ताब्यात घेतले. त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन सोन्याची मंगळसूत्रे, दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन सोन्याच्या बांगड्या, एक चांदीचा पेला, एक चांदीचे नाणे, रोख रक्कम २५ हजार आणि दुचाकी असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी यल्लापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.सातोसेत हाणामारी दोघे गंभीर जखमीबांदा : सातोसे - देऊळवाडी येथे वैयक्तिक वादातून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून विजय अनंत मांजरेकर (४५) व चंद्रकांत सुरबा नागवेकर (७२) अशी त्यांची नावे आहेत.

विजय मांजरेकर यांनी फावड्याने मारहाण केल्याचे चंद्रकांत नागवेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर भारती विजय मांजरेकर यांनी आपले पती विजय मांजरेकर यांना चंद्रकांत नागवेकर व अनिल शिरोडकर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत बांदा पोलिसांत सुरु होते.सातोसे - देऊळवाडी येथील नागवेकर व मांजरेकर कुटुंबियांमध्ये वाद आहेत. वाळू उत्खननावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग