शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विक्रेत्यांबरोबर पोलिसांची आर्थिक मांडवली, मनसे नेते परशुराम उपरकरांचा गंभीर आरोप 

By सुधीर राणे | Updated: June 19, 2023 14:14 IST

..तरच जिल्हा अमलीपदार्थ मुक्त होईल

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात फसत चालली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अमलीपदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह  साजरा करताना एक वार्षिक कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका घेवू नये. काही पोलिस अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांबरोबर आर्थिक मांडवली करीत आहेत असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. पोलिस अधिक्षक यापुढील कालावधीत धडक मोहीम राबवून यावर कडक कारवाई करतील का? असा सवालही उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात मुंबई, गोवा, कर्नाटक आदी भागातून गांजा, हकीम, चरस असे अमलीपदार्थ विक्रीसाठी येतात. हे पदार्थ विक्री करणारे मोठे रॅकेट आहे. महाविद्यालयाच्या बाहेर तसेच जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर तरुणांसह पर्यटकांना राजरोसपणे हे अमलीपदार्थ विक्री केले जातात. त्यामूळे तरुणाईचे आयुष्य उध्वस्त होत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण चोरी तसेच अन्य गुन्हे करीत आहेत. सजग नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली तर अनेक पोलिस संबधित अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांना सूचना देऊन सावध करतात. त्यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अमलीपदार्थ नेमके कोठून येतात? कोण विक्री करतो? याच्या मुळापर्यंत पोलिस गेल्यास जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करता येईल. नागरिक, पोलिस, सर्वपक्षीय नेते यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास जिल्हा अमलीपदार्थ मुक्त होईल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Policeपोलिस