रूग्णांची ओळख पटविण्याचे आवाहन
By Admin | Updated: October 8, 2014 23:00 IST2014-10-08T22:48:13+5:302014-10-08T23:00:16+5:30
नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवून प्रादेशिक रुग्णालयात संपर्क साधावा

रूग्णांची ओळख पटविण्याचे आवाहन
रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन रूग्णांवर मानसिक उपचार करण्यात आले असून, त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. हे रुग्ण पत्ता सांगण्यास असमर्थ असून, रुग्णांच्या नातेवाइकांनी छायाचित्राच्या आधारे त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन या मनोरूग्णालयाने केले आहे. सुदीमा रामेशान यांच्यावर ८ नोंव्हेंबर १९८० आणि अननोन, चिपळूूण या दोन रुग्णांवर २९ आॅगस्ट २००० पासून येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. मात्र, हे रुग्ण पत्ता सांगण्यास असमर्थ आहेत, असे मनोरुग्णालयाने पत्रकाव्दारे कळवले आहे. त्यामुळे या रुग्णांच्या नातेवाईकांनी छायाचित्राच्या आधारे त्यांची ओळख पटवून प्रादेशिक रुग्णालयात संपर्क साधावा आणि त्यांना घेऊन असे आवाहन प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी पत्रकाव्दारे केले आहे. (प्रतिनिधी)