गणेशोत्सवासाठी सतर्कतेचे आवाहन

By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T21:42:22+5:302014-08-24T22:34:39+5:30

मालवणात बैठक : शासनाच्या सर्व विभागांना सूचना

Appeal for censorship of Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी सतर्कतेचे आवाहन

गणेशोत्सवासाठी सतर्कतेचे आवाहन

मालवण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करताना नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शहरात वीज, दूरध्वनी व वाहतुकीची समस्या गंभीर आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांकडून करण्यात आले.
मालवण येथील पोलीस वसाहतीनजिक बहुउद्देशीय सभागृहात मालवण पोलीस स्थानकाच्यावतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, नायब तहसीलदार आंगणे, एसटी स्थानकप्रमुख राजन भोसले, माजी नगराध्यक्षा सुरेखा सरमळकर, नगरसेवक दीपक पाटकर, कांदळगाव पोलीस पाटील शितल परब, सागररक्षक दलाचे नारायण हडकर, आनंद मालंडकर, राजकुमार शेडगे, विजय कांबळी, घुमडे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे, विनायक प्रभू, आनंद देऊलकर, व्यापारी संघाचे उमेश नेरूरकर, विजय केनवडेकर, नितीन तायशेटे, वासुदेव गावकर, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.
विजय केनवडेकर म्हणाले, गणेशोत्सव काळात मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहनांच्या पार्कींगसाठी बाजारपेठेत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना रस्त्याच्या कडेला वाहन उभे करावे लागते. मागील वर्षी याच कारणावरून पोलीस आणि ग्राहकांमध्ये वादाच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी ग्राहकांच्या गैरसोयीचा विचार करून कडक कारवाई करण्याचे टाळावे. वाहनांच्या पार्कींगसंदर्भात त्यांना सूचना करण्यात येतील, असेही केनवडेकर म्हणाले.
मालवण शहरात आणि ग्रामीण भागात विजेची नेहमीच समस्या नागरिकांना भेडसावत असते. वीज वितरण कंपनीने गणेशोत्सवापूर्वी सतर्कता बाळगून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. यावर वीज वितरणचे
अभियंता वावरे यांनी गणेशोत्सव काळात मालवण शहर, पेंडूर, चौके, मालवण देऊळवाडा येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार
असल्याचे शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal for censorship of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.