राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर
By Admin | Updated: April 13, 2017 14:46 IST2017-04-13T14:46:48+5:302017-04-13T14:46:48+5:30
माध्यमिक गटात स्वप्नाली गोसावी, उच्च माध्यमिक गटात योगिता सावंत प्रथम

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत येणा-या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वप्नाली प्रकाश गोसावी हिने प्रथम (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी) क्रमांक मकरंद विश्वास म्हसकर याने द्वितिय (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव कणकवली), निकिता रामदास ओसरमरकर, (शांताराम कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड.) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक योगिता संतोष सावंत ( एस. एम. हायस्कुल कणकवली ) हिने, तेजस्वी म. मांजरेकर
(नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे) हिने व्दितीय, तर राजरत्न कदमने औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस) तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व विजेत्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम जागतिक आरोग्य दिन दि. ७ एप्रिल २0१७ रोजी जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.