वेळापत्रक जाहीर : चुकीची माहिती भरल्यास कारवाई करण्याचा इशारा
By Admin | Updated: January 5, 2015 18:59 IST2015-01-05T18:59:01+5:302015-01-05T18:59:26+5:30
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.

वेळापत्रक जाहीर : चुकीची माहिती भरल्यास कारवाई करण्याचा इशारा
टेंभ्ये : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०१४-१५ ची संचमान्यता यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सन २०१४-१५च्या संचमान्यतेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सोमवार, दि. ५ पासून संचमान्यता प्रक्रिया सुरु होणार आहे. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.
या संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०१४ची विद्यार्थीसंख्या आधारभूत धरण्यात येणार आहे, तर कर्मचाऱ्यांची माहिती १ जानेवारीची स्थिती दर्शवणारी भरावयाची आहे. आॅनलाईन पद्धतीने माहिती भरताना मुख्याध्यापकांनी युजर्स लॉगीन करावयाचा आहे. शाळेची गतवर्षीची माहिती प्रदर्शित झाल्यानंतर आवश्यतेनुसार माहिती अपडेट करावयाची आहे. भरलेली माहिती निश्चित केल्यानंतर मुख्याध्यापकांना यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
सोमवार दि. ५ जानेवारी ते सोमवार दि. १२ जानेवारी दरम्यान शाळांना आपली माहिती आॅनलाईन पद्धतीने २ूँङ्मङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/२ँं’ं या युआरएलवर भरता येणार आहे. दि. ५ ते १५ जानेवारीपर्यंत केंद्रप्रमुखांकडून आॅनलाईन तपासली जाणार आहे. दि. १६ ते २४ जानेवारीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांच्या स्तरावरुन संचमान्यता करुन घेतली जाणार आहे.
एकंदरीत यावर्षी संचमान्यता आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने ती वेळीच पूर्ण होईल व अचूक पद्धतीने करण्यात येईल, असे सध्या म्हटले जात आहे. दि. ५ ते १५ जानेवारीदरम्यान ही माहिती आॅनलाईन मागविण्यात आली आहे. (वार्ताहर)
जबाबदारी निश्चित
शाळास्तरावर भरलेली माहिती केंद्रप्रमुख तपासणार आहेत. शाळा अथवा केंद्रस्तरावर माहिती चुकीची भरली गेल्यास मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख जबाबदार राहणार आहेत. सर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांची माहिती भरुन घेण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची, तर विभागस्तरावर शिक्षण उपसंचालकांची आहे.
यावर्षी संचमान्यता आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळेची माहिती वेळेत आॅनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ती भरताना शाळेकडून चुकीची माहिती भरली गेल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी.