सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय खेळांचे सुधारित कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 14:21 IST2017-09-26T14:00:16+5:302017-09-26T14:21:28+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात येणाºया जिल्हास्तरीय शालेय खो-खो, कबड्डी, मैदानी, योगासने व क्रिकेट या स्पर्धांचे सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय खेळांचे सुधारित कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी दि. दि.२६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात येणाºया जिल्हास्तरीय शालेय खो-खो, कबड्डी, मैदानी, योगासने व क्रिकेट या स्पर्धांचे सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. काही अपरिहार्य करणास्तव या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या.
सुधारित स्पर्धेचे आयोजन पुढील प्रमाणे
खो-खो : १४ वषार्खालील मुले व मुली ( स्पर्धा : दिनांक - २७ सप्टेंबर),
१७ वषार्खालील मुले व मुली (स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर)
कबड्डी : १७ वर्षाखालील मुले व मुली ( स्पर्धा : दिनांक २७ सप्टेंबर),
१४ वर्षाखालील मुले व मुली (दिनांक २८ सप्टेंबर),
१९ वर्षाखालील मुले व मुली - (२९ सप्टेंबर)
मैदानी खेळ : १७ वर्षाखालील मुले व मुली, (स्पर्धा : दिनांक ३ आॅक्टोंबर) ,
१४ व १९ वषार्खालील मुले व मुली -(४ आॅक्टोंबर).
या स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
क्रिकेट : १७ वर्षाखालील मुले व मुली ( स्पर्धा : दिनांक - ५ आॅक्टोंबर) , १४ व १९ वर्षाखालील मुले व मुली - ६ आॅक्टोबर. या स्पर्धा टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे होणार आहेत.
योगासने : १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुले व मुली (स्पर्धा : दिनांक - ६ आॅक्टोंबर) या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे होणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, शैक्षणिक संस्था व पालकांनी यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.