शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Ratris Khel Chale 2: 'अण्णा नाईकां'नी सेल्फीसाठी घेतले पैसे; कारण वाचून अभिमान वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 17:35 IST

रात्रीस खेळ चाले मालिकेत खलनायकाची भूमिका करणाऱ्या अण्णा नाईकांचा वास्तविक जीवनात मात्र हिरो ठरले. सेल्फीच्या बदल्यात त्यांनी पैसे घेउन ते आंबोली येथील सैनिक स्कूलकडे सुपूर्द केले. आतापर्यंत जमा झालेली जवळपास लाखभराची ही रक्कम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भेट दिली आहे. त्यांच्या या कृतीने सामाजिक जबाबदारीचा आदर्शच त्यांनी इतरांसमोर उभा केला आहे.

ठळक मुद्दे 'अण्णा नाईकां'नी घेतले सेल्फीच्या बदल्यात पैसे आंबोलीच्या सैनिक स्कूलला १ लाख १ हजार रुपयांची दिली देणगी

सिंधुदुर्ग : रात्रीस खेळ चाले मालिकेत खलनायकाची भूमिका करणाऱ्या अण्णा नाईकांचा वास्तविक जीवनात मात्र हिरो ठरले. सेल्फीच्या बदल्यात त्यांनी पैसे घेउन ते आंबोली येथील सैनिक स्कूलकडे सुपूर्द केले. आतापर्यंत जमा झालेली जवळपास लाखभराची ही रक्कम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भेट दिली आहे. त्यांच्या या कृतीने सामाजिक जबाबदारीचा आदर्शच त्यांनी इतरांसमोर उभा केला आहे.अण्णा नाईक म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो खलनायकी प्रवृत्तीचा गावगुंड. त्यांच्या डोळ्यातली जरब कुणाचाही थरकाप उडवणारी, आयाबाया तर अण्णा दिसले की, रस्ताच बदलतात.

टीव्हीवरील लोकप्रिय रात्रीस खेळ चाले या मालिकेत ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर प्रत्यक्षात मात्र नायक ठरले आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंबोलीच्या सैनिक स्कूलला १ लाख १ हजार रुपयांची देणगी दिली.रात्रीस खेळ चाले या मालिकेनं रसिकांना अक्षरश: वेड लावले आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडीजवळ आकेरी येथे या मालिकेच्या सेटवर अनेक रसिक प्रेक्षक येत असतात आणि अण्णा नाईकांसोबत सेल्फी काढायचा हट्ट धरतात.

कोणताही कलाकार आपल्या चाहत्याच्या या सेल्फी मागणीला नाही म्हणून नाराज करत नाही, परंतु प्रत्यक्षात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यावर अण्णांनी एक शक्कल लढवली, त्यांनी 'सैनिकहो तुमच्यासाठी'नावानं एक ड्रॉप बॉक्स तयार केला.

सेल्फी काढायची तर या ड्रॉप बॉक्समध्ये रक्कम टाका, असं ते सांगायचे. वर्षभरानंतर त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यात लाखभर रुपये जमले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी ती रक्कम आंबोली सैनिक स्कूलला भेट म्हणून दिली.

 

टॅग्स :Ratris Khel Chale 2रात्रीस खेळ चालेsindhudurgसिंधुदुर्ग