शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 23:09 IST

कर्नाटक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होता तैनात.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून छत्तीसगड रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे ते एकूण पाच जण सर्व छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले पोलिस गोव्याला पर्यटनासाठी म्हणून शनिवारी सकाळी गेले होते. यातील मितीलेस पॅकेरा (३५) या पोलिसाचा दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास गोव्याहून पर्यटन करून परतत असताना हे सर्व पोलिस लघुशंकेला म्हणून आंबोली घाटातील धबधबे जवळील एका वळणावरती थांबले. त्यातील तिघेजण लघुशंकेसाठी उतरले त्यातील मीतेलेस पॅकेरा हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास ३०० फूट खोल खाली कोसळला. 

रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे त्याच्यासोबत होते त्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी लागलीच आंबोली पोलिस स्थानकातील दत्तात्रय देसाई यांना संपर्क केला. दत्ता देसाई यांनी आंबोली रेस्क्यू टीम व स्वतः घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ ३० मिनिटात खाली दरीत उतरत वाचवण्याचा प्रयत्न केला. 

ज्यावेळी रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर, मायकल डिसोजा हे खाली पोहोचले त्यावेळी थोडाफार प्राण त्याच्यामध्ये शिल्लक असल्याचे सांगितले.  परंतु काही काळाने तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला.

याबाबतची माहिती त्याच्या वरिष्ठांना देण्यात आली असून त्याचे वरिष्ठ कर्नाटक येथून येण्यास रवाना झाले आहेत. आंबोली रेस्क्यू टीम मार्फत व आंबोली पोलिस स्थानक पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, दीपक शिंदे,  अभिजीत कांबळे,  दीपक नाईक आदी यांनी घटनास्थळी जात तत्परतेने बचाव कार्यास मदत केली.  मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे. उद्या रविवारी मृतदेहाचे सर्वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी