शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

पर्यटकांना दिलासा! आंबोली धबधब्यावरील तिकिट आकारणी लांबणीवर 

By अनंत खं.जाधव | Published: July 08, 2023 6:20 PM

प्रशासनाच्या निर्णयाला राजकीय नेत्यांचा विरोध 

सावंतवाडी : आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडून तिकीट आकारण्याचा निर्णय वनविभागाच्या पुढाकारातून दोन दिवसापूर्वी घेण्यात आला होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून सद्या तिकिट आकारणी केली जाणार नाही. याला खुद्द सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनीही दुजोरा दिला आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाला स्थानिक राजकीय नेत्यांचा विरोध असल्यानेच हा निर्णय स्थगित ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.आंबोली येथील मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शनिवार व रविवारी हजारो पर्यटक येत असतात. या पर्यटकांकडून जर तिकिट आकारणी केल्यास आलेल्या पैशातून धबधबा परिसरात अनेक सुखसोई उपलब्ध होतील असे वनविभागाला वाटते.पण हा मुख्य धबधबा जरी पारपोली गावाच्या हद्दीत येत आहे. तर धबधब्याकडे येणारा रस्त्यावर आंबोली ग्रामपंचायतची हद्द आहे. तसेच धबधब्याचे पाणी चौकुळच्या गावाच्या हद्दीतून येत असल्याने तिकिट आकारणी नेहमीच वादात सापडली आहे.पाच वर्षापूर्वी पारपोली वनव्यवस्थापन समिती आंबोली येथील धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकिट आकारणी करत होते. पण या तिकिट आकारणीला आंबोली ग्रामपंचायत कडून विरोध झाला होता. तर चौकुळ येथील ग्रामस्थांकडून ही विरोध केला होता. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय स्थगित ठेवला होता.मात्र या वर्षी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनी नव्याने निर्णय घेत आंबोली धबधब्यावर येणाऱ्या १४ वर्षावरील व्यक्तीला २० रुपये तर ५ वर्षावरील मुलास १० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणी ही शनिवार, रविवार पासून होती. मात्र या निर्णयाला उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी तात्पूरती स्थगिती दिली आहे.ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेऊ : रेड्डी आंबोली धबधब्यावर तिकिट आकारणी निर्णयाला विरोध असल्याने हा निर्णय थांबवला असून ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. घाटात वाढता कचरा ही समस्या असून यावर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळेच येणाऱ्या पैशातून आंबोली घाटात स्वच्छता तसेच पर्यटकांना सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या असे सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटनforest departmentवनविभाग