आंबोलीतील ‘तो’ खून पतीकडूनच--
By Admin | Updated: January 23, 2015 23:41 IST2015-01-23T23:06:41+5:302015-01-23T23:41:39+5:30
पोटगीला कंटाळून दिरासह पाचजणांचे कृत्य

आंबोलीतील ‘तो’ खून पतीकडूनच--
आंबोली : कित्तूर चन्नमा येथील विवाहिता लक्ष्मी बसुराज मादार (वय ३०) हिच्या मृत्यूचे गूढ पोलिसांनी आज, शुक्रवारी उलघडले. पोटगीच्या पैशाच्या वादातून पती बसूराज मादार याने भाऊ संतोष व मावस बहीण निमोली यांच्यासह आणखी दोघांच्या मदतीने लक्ष्मीचा खून केल्याची कबुली दिली. शुक्रवारी दुपारी जेथे मृतदेह टाकला होता, ती जागाही त्याने दाखविली. मृतदेह आंबोली-नानापाणी येथील जंगलातच टाकला होता. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या.
पाच वर्षांपूर्वी लक्ष्मीचा विवाह झाला होता. अल्पावधीतच तिचा घटस्फोट झाला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पती बसुराजला लक्ष्मीला पोटगी द्यावी लागत होती. पोटगी न मिळाल्यास लक्ष्मीचे कुटुंब सतत पोलिसांकडे जात असे. हाच राग मनात धरून हा खुनाचा कट रचला.