शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न वाढीचा पर्याय

By Admin | Updated: July 1, 2014 00:27 IST2014-07-01T00:23:42+5:302014-07-01T00:27:37+5:30

कृषीदिन विशेष : कृषी संस्कृती बळकटीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज

An alternative to income growth in the farming industry | शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न वाढीचा पर्याय

शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न वाढीचा पर्याय

अजय लाड ल्ल सावंतवाडी
शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न सद्यस्थितीत घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीपूरक उद्योगांकडे वळत नव्या वाटा शोधण्याची गरज भासत आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला पाहिजे. शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतीची मशागत केल्यास व त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगाचे सूत्र स्वीकारल्यास मिळणारे उत्पन्न शेतकऱ्याला उन्नतीकडे नेईल आणि यातूनच महाराष्ट्राची कृषीसंस्कृतीलाही बळकटी मिळेल, एवढे निश्चित.
महाराष्ट्रामध्ये १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वाढत्या महागाईत भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला नेहमीच उद्याची चिंता लागून राहिल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा अभ्यास करुन शेतातील मातीचे व पाण्याचे परीक्षण करुन घेत कोणते बियाणे व खते वापरावीत याबाबत मार्गदर्शन घेतल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल. सद्यस्थितीत पावसाने मारलेली दांडी, शेतीच्या कामांकरिता बँकांचे घेतलेले कर्ज व मिळणाऱ्या अत्पल्प उत्पन्नामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसते आहे.
योजनांचा फायदा किती ?
शेतकऱ्यांकरिता करण्यात आलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना खरेच फायदा होतोय का, याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. योजना राबविल्यास त्याचा फायदा काही शेतकऱ्यांना झाल्यास त्या योजनांना विरोध होतो. याचा परिणाम ती योजना योग्य प्रकारे राबविली जात नाही. कृषी उत्पादन कमी होते. त्यामुळे कृषी योजनांना प्रत्येक शेतकऱ्याला समसमान फायदा व्हायला हवा.

Web Title: An alternative to income growth in the farming industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.