शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

By सुधीर राणे | Updated: August 8, 2023 17:39 IST

कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ

कणकवली: रेल्वे स्टेशन आणि परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकाना समाधान वाटेल. कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यांतर्गत निधी देऊन कोकणच्या विकासासाठी महायुती सरकार पुढाकार घेऊन चांगले काम करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणातील जनतेच्या विकासासाठी  महायुती सरकार कायमच तत्पर राहील असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.कोकणातील १२ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचे ऑनलाईन भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन करण्यात आले.कणकवली रेल्वे स्थानकासाठी ६ कोटी रुपयांचा  निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे कणकवली येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कणकवली  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.अमृत भारत योजनेच्या धर्तीवर आपल्या कोकण रेल्वेवरील प्रमुख १२ स्टेशनचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसंच अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वैभववाडी भाजप तालुका अध्यक्ष नासिर काझी, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे राजन चिके, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महिला नेत्या राजश्री धुमाळे ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेNitesh Raneनीतेश राणे tourismपर्यटन