सीमेवरील गावात जाण्यास परवानगी द्या

By Admin | Updated: October 10, 2014 23:04 IST2014-10-10T21:32:06+5:302014-10-10T23:04:18+5:30

गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यातील रिक्षा चालकांची मागणी

Allow to go to the village on the border | सीमेवरील गावात जाण्यास परवानगी द्या

सीमेवरील गावात जाण्यास परवानगी द्या

सांवतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील पत्रादेवी महामार्गावरून गोवा राज्यालगत असलेल्या सिंधुदुर्ग हद्दीतील गावांमध्ये जाण्यास परवानगी मिळावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पार्सेकर यांनी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून एक महिन्यात हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बांदा येथे आले होते. यावेळी सावंतवाडी, बांदा, मळेवाड, आरोंदा, रेडी, शिरोडा व अन्य भागातील रिक्षा मालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी उपाध्यक्ष धमेंद्र सावंत, जिल्हा सचिव सुधीर पराडकर, संतोष प्रभूकेळूसकर, गुरुप्रसाद नाईक, राजेश बांदेकर, देवानंद कुबल, अशोक सावंत, मंदार कल्याणकर आदी रिक्षाचालक उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या मागणीनुसार २९ जून २००४ साली संदर्भीय पत्रानुसार मोटर वाहन कायदा १९८८ कलम ८८ (१) मधील तरतुदीप्रमाणे गोवा राज्याची सुरुवात पत्रादेवी ते मालपे तसेच या महामार्गालगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे सातार्डा, सातोसे, डिंंगणे, गाळेल, न्हयबाग तसेच पेडणे रेल्वेस्थानक या गावात जाण्यासाठी परवानगी दिली होती. २००४ ते २०११ या कालावधीत कसलाही त्रास गोवा आरटीओ किंवा पोलिसांकडून होत नव्हता. आरोंदा पुलावरून हरमल, पालवे, केरी या ठिकाणी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर गोवा हद्दीतील गावे आहेत. तेथील लोक दर शनिवारी आरोंदा आठवडा बाजारासाठी येत असतात. त्यांनाही रिक्षामधूनच प्रवास करावा लागतो. तसेच अन्य दिवशीही पेडणे रेल्वे स्थानक तथा सिंधुदुर्गच्या गोवा राज्यानजीकच्या गावांमध्ये जावे लागते. (वार्ताहर)

गिोवा आरटीओकडून दंड वसुली
संधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, मळेवाड, आरोंदा, शिरोडा व सावंतवाडीतील रिक्षा चालकांना पत्रादेवी महामार्गावरून प्रवास करायला गोवा आरटीओकडून मज्जाव केला जातो.
रिक्षाचालकांनी सिंधुदुर्ग आरटीओचे पत्रक दाखविले तरीही गोवा आरटीओकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो.
विनाशुल्क गावात जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: Allow to go to the village on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.