दाभोळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीचे वाटप
By Admin | Updated: June 25, 2015 00:58 IST2015-06-25T00:58:06+5:302015-06-25T00:58:57+5:30
धोकादायक घरातील कुटुंबांचे स्थलांतर

दाभोळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीचे वाटप
दापोली : तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडी येथील इतर धोकादायक घरातील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांना तातडीने पर्यायी घरांची व्यवस्था करुन देण्याचे आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेशही पालकमंत्र्यांच्याहस्ते देण्यात आले.
दाभोळ टेमकरवाडी येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची पाहणी करुन वायकर यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अनिल सावंत, सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते.