शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : युती तुटण्याची नांदी कणकवलीतून : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:09 PM

२०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देयुती तुटण्याची नांदी कणकवलीतून : प्रमोद जठारपारकर, रावराणेंना दोन दिवसांची मुदत

सावंतवाडी : २०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी भाजप नेते संदेश पारकर व अतुल रावराणे यांनी पुढील दोन दिवसांत नीतेश राणे यांच्या प्रचारात सहभागी व्हावे किंवा पक्षाचा सरळ राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांची नाईलाजाने हकालपट्टी करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी जठार म्हणाले, नाणार प्रकल्पाला भविष्यात राणे यांचा विरोध असणार नाही, याच अटीवर त्यांना पक्षात घेण्यासाठी मी हिरवा कंदील दिला. राणेंचा भाजप प्रवेश शिवसेनेमुळेच रखडला होता. आता ते रितसर भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे कोकणात भविष्यात भाजप हाच नंबर एकचा पक्ष असेल. कणकवलीत शिवसेनेने भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर उमेदवार रिंगणात उतरल्याने युती तुटली आहे. आता यापुढील निवडणुकीत कोकणात शिवसेनेशी युती होणार नाही, असेही जठार यांनी सांगितले.भाजपाला हक्काचा आमदार हवा आहेनारायण राणे हे लोखंड आहे. त्या लोखंडाला भाजपाचा परिस स्पर्श झाला असल्याने भाजपात त्यांचे सोने होईल. राणे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आश्वासित केले आहे. ते भाजपची ध्येय धोरणे, पक्षहित नक्कीच पाहतील, असा विश्वास राणे यांनी दिला आहे. राजन तेली भाजपचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आता राणेंच्या स्वाभिमान पक्षानेदेखील प्रचार सुरु केला आहे. भाजपाला हक्काचा आमदार या मतदारसंघात हवा आहे, असेही जठार म्हणाले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीvidhan sabhaविधानसभाNarayan Raneनारायण राणेPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग