शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात दिलासा; शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने वगळता सर्व दुकाने सुरू राहणार : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:53 IST

याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील जे लोक जिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.कोरोना संदर्भात घ्यावयाच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करावयाचे आहेत, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या आॅरेंज झोनमध्ये आहे. प्रत्येक झोनविषयी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासन निर्णय घेत असून आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे. तर शहरी भागात निवासी संकुलातील व एकटी असणारी सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी आहे. सुरू राहणाऱ्या दुकानांमध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश असणार आहे. या सर्व दुकानदारांनी शारीरिक अंतर ग्राहकांकडून योग्य पद्धतीने पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी. तसेच कोरोना संदर्भात घ्यावयाच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करावयाचे आहेत, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, कामगार यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यस्थानमधील १२९ मजूर व कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. हे सर्वजण त्यांच्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करणार आहेत. तर आंध्रप्रदेश येथील भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे ११ जण जिल्ह्यात अडकले होते. त्यांनाही हैद्राबाद येथे जाण्यास परवानगी दिली आहे. तर जवाहर नवोदय विद्यालयाचे मूळच्या उत्तरप्रदेशमधील २८ विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात अडकलेल्या व मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार केलेल्या व जिल्ह्यात येऊ इच्छिणाºयांसाठी तयार करण्यात आलेल्या अशा दोन्ही लिंकवर संपर्क साधावा.गोव्यात अडकलेल्यांना आणण्यासाठी प्रयत्न

जिल्हाधिकारी म्हणाल्या, परवानगी मिळताच मजुरांसह विद्यार्थी, कामगार यांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहे. गोवा राज्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात परत आणण्यासाठीचा प्रस्ताव गोवा शासनाकडे सादर केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्या व्यक्तींना जिल्ह्यात परत आणण्यात येणार आहे. याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील जे लोक जिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी