कोकणातील सर्व बंदरे रेल्वेसेवेने जोडणार : गडकरी
By Admin | Updated: August 24, 2014 23:37 IST2014-08-24T23:37:01+5:302014-08-24T23:37:01+5:30
कोकणवासीयांनी संपूर्ण सहकार्य द्यावे,

कोकणातील सर्व बंदरे रेल्वेसेवेने जोडणार : गडकरी
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर महत्त्वाची १२ बंदरे आहेत. त्यातील ८ बंदरे मोठी असून, कोकणातील औद्योगिक तसेच पर्यटन विकासासाठी ही सर्व बंदरे रेल्वेने जोडली जातील. त्यासाठी कोकणवासीयांनी संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, नौकानयन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून पाच हजार कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावातील सप्तलिंगी पुलाजवळ महामार्ग चौपदरीकरणातील १२ पूल व रेल्वेमार्गावरील दोन उड्डाण पूल यांचे प्रातिनिधिक भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.‘रोड साईड अॅमिनिटी सेंटर्स’ सुरू करणार, कोकण जागतिक पर्यटन केंद्र बनविले जाणार, कोकणातील प्रत्येक गाव नरेगा योजनेतून हिरवेगार बनवणार, समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस् विकसित करणार, मरिन इंजिनिअरिंंगचे सर्व अभ्यासक्रम चेन्नई मुख्य केंद्रामार्फत रत्नागिरीत सुरू करण्याची तयारी असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.