शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन

By सुधीर राणे | Updated: December 13, 2022 16:02 IST

भाजपचा केवळ कागदावरच विकास 

कणकवली: भाजपचे काही नेते मतदारांवर दबाव आणणारी वक्तव्ये करीत आहेत. आमदार नितेश राणे हे तर मतदारांना थेट धमकी देत आहेत. या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसेच या निवडणुकीनंतर भाजप अर्थात राणे भाजप विरोधात सर्वांनी संघर्षासाठी उभे राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने न होता तिथे दबावाचे राजकारण केले जात आहे. नांदगाव येथील प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी आपल्या विचाराचा सरपंच न दिल्यास निधी मिळणार नाही अशी थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे राजकारण करण्याचे ठरवले आहे काय ? जिल्हातील भाजप वगळून  इतर ग्रामपंचायतींना निधी देणार नाहीत का? तसेच जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  आतापर्यंत त्यांनी किती निधी दिला ? हे प्रथम जाहीर करावे. भाजपचा केवळ कागदावरच विकास मुळात नितेश राणे यांना माहीतच नाही की, केंद्र आणि राज्य शासनाचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळतो. भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंत किती विकास झाला ? हे पाहिले तर त्या गावांमध्ये साधा रस्ता नाही, वीज नाही अशी परिस्थिती आहे. भाजपचा केवळ कागदावरच विकास झालेला आहे. ज्या गावात भाजपची सत्ता आहे. त्या गावातील दवाखान्यात डॉक्टर नाहीत, रेशनवर धान्य नाही, याकडे दुर्लक्ष करून नितेश राणे थेट निवडणुकीत जनतेला धमकी देत फिरत आहेत हे योग्य नाही.केसरकर मंत्री झाल्यापासून दहशतवाद संपला का?शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे यापूर्वी सिंधुदुर्गातील राणेंच्या दहशतवादावरच राजकारण करून सगळ्या निवडणुका जिंकून आले आहेत. आता केसरकर हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना जिल्ह्यातला हा दहशतवाद संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. केसरकर मंत्री झाल्यापासून जिल्ह्यातला दहशतवाद संपला का ? ते त्यांनी एकदा जाहीर करावे.

दहशतवादाच्या नावावर आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी घालवली. विकास मात्र झाला नाही.  ते शिक्षणमंत्री झाल्या पासून शाळा इमारतीच्या दुरूस्तीसाठी  किती निधी मिळाला? किंवा त्यांनी केलेले जिल्हातील एक तरी काम जनतेला सांगावे असे आव्हानही उपरकर यांनी दिले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNitesh Raneनीतेश राणे MNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर