कणकवलीतील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले
By Admin | Updated: June 5, 2015 00:18 IST2015-06-04T23:52:24+5:302015-06-05T00:18:54+5:30
विजय नाईक शोकसभा : जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

कणकवलीतील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले
कणकवली : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने कार्यरत असणाऱ्या विजय नाईक यांचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी कार्यरत राहिल्यास तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगतानाच विजय नाईक यांच्या निधनामुळे एका अजातशत्रू व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
येथील कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात ज्येष्ठ उद्योगपती विजय नाईक यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील व्यक्तींनी विजय नाईक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.
यावेळी संजय पडते, अभय शिरसाट, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश कामत, अनिल डेगवेकर, प्राचार्य संभाजी शिंदे, मुरलीधर नाईक, सुशांत नाईक, राजू शेट्ये, व्ही. डब्ल्यू. सावंत, सचिन सावंत, जयसिंग नाईक, राजू राणे, सुहास पालव, राजेंद्र सावंत, डी. पी. तानवडे, अशोक करंबेळकर, एस. टी. सावंत, विलास साळसकर, विजय कोदे, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. शैलेश भोगले, राजश्री धुमाळे, कणकवलीच्या नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, अनिल हळदिवे, अनिल शेटये, दादा कुडतरकर, डॉ. तुळशीराम रावराणे, अॅड. उमेश सावंत आदींनी आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. (वार्ताहर)