शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाच्या आवारात क्रिकेट खेळत छेडले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:44 IST

mns, cricket, statetransport, kudal, sindhudurgnews मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ बसस्थानक आवारात चक्क क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध केला. येथील बसस्थानक इमारत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी व जनतेचा पैसा वाया घालविल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही मनसेच्यावतीने बनी नाडकर्णी यांनी दिला.

ठळक मुद्दे मनसेकडून प्रशासनाचा निषेध बसस्थानक सुरू न केल्याने संताप व्यक्त

कुडाळ : आगामी इशारा देऊनही दिवाळीपूर्वी कुडाळमधील बसस्थानक सुरू न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ बसस्थानक आवारात चक्क क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध केला. येथील बसस्थानक इमारत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी व जनतेचा पैसा वाया घालविल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही मनसेच्यावतीने बनी नाडकर्णी यांनी दिला.कुडाळ बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तरी अजूनही हे बसस्थानक सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यांचा सामना गेले कित्येक महिने करावा लागत आहे. प्रवाशांना या त्रासापासून वाचविण्यासाठी बनी नाडकर्णी यांनी दिवाळीपूर्वी बसस्थानक सुरू करा अन्यथा या आवारात क्रिकेट स्पर्धा आयोजित करू, असा इशारा दिला होता.दिवाळी सण संपला तरीही हे बसस्थानक सुरू न केल्याने शनिवारी सकाळी एसटी प्रशासनाच्या कारभाराविरोधात बनी नाडकर्णी यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, सिध्देश कुटाळे आदी सहभागी होते.

यावेळी या सर्वांनी बसस्थानकाच्या आवारातच क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडले. क्रिकेट खेळताना काही बसही काही वेळेसाठी थांबविण्यात आल्या. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अनेक प्रवासी, नागरिकांनीही दाद दिली. बसस्थानकाच्या कामात भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा वाया गेला आहे. त्यामुळे या विरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा नाडकर्णी यांनी दिला.हा तर अडीच कोटींचा गोठा : बनी नाडकर्णीअद्याप या बसस्थानकातून बससेवा सुरू नाही. मात्र, रात्रीचे अवैद्य धंदे सुरू असतात. सकाळी बसस्थानकावर गाई, म्हशींचा वावर जास्त असतो. त्यामुळे अडीच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची इमारत ही बसस्थानकापेक्षा अडीच कोटींचा गोठा असल्यासारखी वाटते, असा टोलाही बनी नाडकर्णी यांनी लगावला आहे. 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळstate transportएसटी