शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत धरणे आंदोलन, एसटीची निवृत्त कर्मचारी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:23 IST

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्दे कणकवलीत धरणे आंदोलन, एसटीची निवृत्त कर्मचारी संघटना आक्रमकआंदोलनकर्त्यांना भेटले अधिकारी

कणकवली : राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सदानंद आपटे, सचिव मनोहर आरोलकर, प्रकाश साखरे, सदानंद रासम, अशोक राणे, राजन कोरगांवकर, चंद्रकांत जैतापकर, सुधाकर मोरजकर, रमेश धामापूरकर, नरेश राणे, कांता झगडे, प्रदीपकुमार जाधव, एच. बी. पटेल, रविकांत परब, रमेश निकम, सुभाष खोचरे उपस्थित होते.यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये उपदान कायद्यानुसार सेवानिवृत्तांना उपदानाची रक्कम एक महिन्याच्या आत मिळाली पाहिजे. सोबत कर्मचाऱ्यांना उपदान रकमेचा गोषवारा मिळावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. १ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार मुद्दा क्र. १२ मध्ये विधवा, विधुर यांना मोफत सेवा पास देताना त्यांचे वय ७५ वरून ६५ करण्यात आले.वास्तविक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांची पत्नी, पती यांना वयाची अट नाही. तशीच कार्यवाही विधवा, विधुर यांच्याबाबतीत असावी व त्यांनाही सहा महिन्यांचा मोफत प्रवास पास देण्यात यावा. आता महामंडळाने लालपरी व निमआराम बसेस धावताना दिसत नाहीत. त्याऐवजी नवीन नामकरण केलेल्या सर्व राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांमधून विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात यावी.मोफत पासाची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी असावी. मोफत पास सहा महिने अनुज्ञेय न ठेवता दोन-दोन महिन्यांचे तीन पास देण्यात यावेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती नसल्याकारणाने ते वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असताना त्यांच्याकडून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज न स्वीकारता राजीनामा घेण्यात आला.

त्यांच्या सेवेचा विचार होऊन त्यांना उपरोक्त संदर्भीय मोफत पास देण्यात यावा. म्हणजेच राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश करावा. तसेच वेतनवाढ १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात यावी व त्यापासूनचाच फरक अदा करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग