शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लाच प्रकरणानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अनेक रंजक कथा येऊ लागल्या बाहेर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 13, 2023 16:38 IST

तक्रारदार म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी 

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुरूवारी घडलेल्या लाच प्रकरणानंतर या पोलिस ठाण्याच्या आतमध्ये चालेल्या एकापेक्षा एक अशा रंजक कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. अंतर्गत हेवेदावे आणि त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष यामुळेच एखादा तक्रारदार आला तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आली अशीच काहिशी परिस्थिती सावंतवाडी पोलिस ठाण्याची झाल्यानेच एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच घेण्याचे धाडस या अधिकाऱ्यांचे झाल्याचे बोलले जात आहे.सावंतवाडी पोलीस ठाणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श पोलिस ठाणे म्हणून ओळखले जायचे. पण ही ओळख आता मागील काहि महिन्यापासून पूसत चालली आहे. सावंतवाडीत अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ना कुणाला धाक राहिला आहे ना कुणाची भिती राहिली आहे. अवैध धंदेवाईकाचे सोबतीच काही पोलिस बनल्याने कारवाई कुणावर करायची असाच प्रश्न पडला आहे.कारवाई केलीच तर कारवाई करणारा पोलिस अडचणीत अशा प्रकारचा समज पोलिसांमध्ये झाल्याने कोण रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. यामुळे सावंतवाडीत पोलिस ठाणे बदनाम होऊ लागले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांमधील अर्तगत हेवेदावे वाढल्याने ते थांबवणे गरजचे असून पोलीस ठाण्याला सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे.प्रभारी अधिकाऱ्यांची खुर्ची फिरत्या रंगमंचासारखीसावंतवाडी पोलिस ठाणे हे अधिकाऱ्यांची रंगीत खुर्ची बनली असून मागील साडेतीन वर्षात तब्बल पाच ते सहा अधिकारी या पोलिस ठाण्याचे प्रभारी बनले. तीन अधिकारी अडीच वर्षे राहिले तर उर्वरित तीन अधिकारी काही दिवसांसाठी तर काही महिन्यांसाठी सावंतवाडीत आले आणि गेले. त्यामुळे पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची खुर्ची फिरत्या रंगमचासारखी झाल्याने कर्मचाऱ्यावर वचक कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे.वाढते अवैध धंदे आणि पोलिस बनले मित्रसावंतवाडीत सध्या अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून गोवा बनावटीच्या दारू विक्रीचे सावंतवाडी केंद्र बनले आहे. हे करत असताना पोलिसांचा आशिर्वाद महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अवैध धंदेवाईकाचे पोलिसच मित्र बनल्याने कारवाई कुणावर करायची असाच प्रश्न पडू लागला आहे.पोलिस अधीक्षकांनी साफसफाई मोहीम राबवण्याची गरजसावंतवाडी पोलीस ठाण्याचा आदर्श कायम ठेवायचा असेल तर पोलिस अधीक्षकांनी च आता साफसफाई मोहीम राबविण्याची गरज असून झारीतील शुक्राचार्य शोधून काढून त्यांना खड्या सारखे बाजूला करण्याची गरज आहे. तरच सावंतवाडीत फोफावलेले अवैध धंदे आणि वाढती दादागिरी थांबविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीPoliceपोलिस