शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

...यानंतर जिल्ह्यात फिरू देणार नाही

By admin | Updated: January 19, 2016 23:36 IST

नीतेश राणेंचा पालकमंत्र्यांना इशारा : काँग्रेसच्या आंदोलनाला १४४ कलम का?, प्रशासन दबावाखाली असल्याचा आरोप

सावंतवाडी : आज आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढतो, मात्र भविष्यात जिल्ह्याचा विकास असाच ठप्प राहिला, तर जिल्ह्यात तुमची गाडी फिरू देणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला. आम्ही आंदोलनाचा इशारा दिला की, प्रशासन नेहमीच १४४ कलम का लावते, प्रशासन कोणाच्या दबावाखाली वागते आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेसने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते माजी खासदार कार्यालयाकडून आंदोलनासाठी जात असताना त्यांना येथील श्रीराम वाचन मंदिरनजीक पोलिसांनी अडवले. त्यानंतर आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, विकास सावंत, अशोक सावंत, प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, गोट्या सावंत, सभापती अंकुश जाधव, माजी सभापती गुरूनाथ पेडणेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, शहरअध्यक्ष सुधीर आडिवरेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदिप कुडतरकर, मंदार नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते.आमदार नीतेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प आले. मात्र, युतीच्या काळात हे प्रकल्प ठप्प झाले आहेत. पालकमंत्री वृत्तपत्रातून निधीची घोषणा करतात. मात्र, प्रत्यक्षात एक रूपयांची कामे सुरू झाली नाहीत. पालकमंत्री दहशतवादाचा बाऊ करून निवडून आले आणि आता जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री नेहमी प्रेमाने जग जिंकता येईल असे सांगतात. मात्र, प्रत्यक्षात ते आम्हाला सोडा जिल्ह्याला जिंकू शकले नाहीत.त्यांनी फक्त गोव्याला प्रेमाने जिंकले, अशी खिल्ली केसरकर यांचे नाव न घेता उडवली. यापुढे केसरकरांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. तसेच जिल्ह्यातील विकासाची कामे सुरू झाली नाहीत, तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी आमदार राणे यांनी दिला. माजी खासदार नीलेश राणे यांनी तर शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली. आम्ही आंदोलने का करतो, याचा जरा विचार पालकमंत्र्यांनी केला पाहिजे होता. खासदार विनायक राऊत दिल्लीत, तर दीपक केसरकर हे राज्यात जिल्ह्याचे नाव खराब होईल, असे काम करीत आहेत. नारायण राणे हे पालकमंत्री असतानाची जिल्ह्याची कामगिरी आणि आताच्या पालकमंत्र्याच्या काळात जिल्ह्याची झालेली अधोगती सर्र्वानी ओळखावी, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार वैभव नाईक यांनी आम्हाला आंदोलनाची धमकी वृत्तपत्रातून देऊ नये, हिंमत असेल तर समोर येऊन बोला. आम्ही जेवढी आंदोलने केली तेवढी यांनीही केली नसतील, असेही यावेळी माजी खासदार राणे म्हणाले.काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, पालकमंत्री नेहमी बरं आहे का म्हणतात आणि लोकांची फसवणूक करतात. त्यांना येथील विकासाचे काय पडले नसल्याचे सांगितले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदिप कुडतरकर, दत्ता सामंत, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, अस्मिता बांदेकर आदींनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक रवींद्र म्हापसेकर यांनी केले. (प्रतिनिधी)पोलीस छावणीचे स्वरूप : पोलिसांच्या भीतीने कार्यकर्ते पांगलेभाजपचे गाय, बैल तसेच इतर प्राण्यांवर प्रेम ऊतू जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून पोपट आणून बसवला आहे, अशी टीका प्रमोद जठार यांच्यावर केली. नियोजन बैठकीत नारायण राणे यांचे अभिनंदन करणारे हेच आणि आता टीका करणारे हेच ही भाषा त्यांना कोठून येते, असा सवाल नीतेश राणे यांनी केला. काँग्रेसच्या आंदोलनामुळे सावंतवाडीला मंगळवारी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल पाच ते सहा पोलीस व्हॅन दोनशे ते अडीचशे पोलीस यामुळे काँग्रेसचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते सावंतवाडीत येऊनसुध्दा काही तरी होईल, या भीतीने सर्वत्र पांगले होते. केसरकरांनी फक्त गोव्याला जिंकलेआम्ही सावंतवाडीत आंदोलन करण्यापेक्षा गोव्यात आंदोलन केले पाहिजे होते. तर पालकमंत्री आम्हाला भेटले असते. ते प्रेमाने आम्हाला कधीच जिंकूच शकले नाहीत. महाराष्ट्रालाही नाही. त्यांनी फक्त प्रेमाने गोव्याला जिंकले, अशी खिल्लीही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केसरकरांची उडवली.प्रांताधिकारी येईपर्यंत हलणार नाही : नीतेश राणेसकाळी ११.३० च्या सुमारास माजी खासदार कार्यालया समोरून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा नगरपालिकामार्गे श्रीराम वाचन मंदिराकडे गेला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते. मोर्चा ज्यावेळी पालकमंत्र्यांच्या घराजवळ जाण्यास आला. त्यावेळी पोलिसांनी नियोजनात ठरल्याप्रमाणे अडवला. त्यानंतर आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पुन्हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर जात असतानाच पोलिसांनी तो अडवला. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी जोपर्यंत येथे येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.