शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा कालावधीत प्रशासनाने सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:37 IST

आंगणेवाडी यात्रा २५ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा ४ मार्च रोजी होणार आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यांत्रांच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या सतर्कतेने पार पाडाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत केली.

ठळक मुद्देआंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा कालावधीत प्रशासनाने सतर्कता बाळगा : दिलीप पांढरपट्टेआंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रा २५ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा ४ मार्च रोजी होणार आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यांत्रांच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या सतर्कतेने पार पाडाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत केली.आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रे संदर्भात देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सोबत यात्रेतील सुविधा निर्माण करणे तसेच अडीअडचणी बाबत अधिकारी वर्गासमवेत बैठक झाली.

बैठकीस पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, उपविभागीय अधिकारी निता शिंदे, विकास सूर्यवंशी, आंगणेवाडी देवस्थानचे नरेश आंगणे, अनंत आंगणे, गणेश आंगणे, दिगंबर आंगणे, दत्तात्रेय आंगणे, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष किशोर पेडणेकर, विकास तेजम, चंद्रशेखर बोंडाळे, जयदत्त नाणेरकर, बाळकृष्ण मुणगेकर तसेच सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन कक्षाने यात्रेपूर्वी रंगीत तालीम घ्यावी, दोन्ही ठिकाणच्या यात्रा मार्गावरील झाडी तोडणे तसेच रस्त्यांच्या साईड पट्ट्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रे पूर्वी पूर्ण करावीत. बी.एस.एन.एल विभागाने संदेशवहन यंत्रणा सुव्यवस्थित करावी, वीज कंपनीने यात्रा कालावधी दरम्यान वीज पुरवठा सुस्थितीत ठेवावा.

अन्न वऔषध प्रशासनाने यात्रा स्थळावरील स्टॉलची तपासणी करावी, कणकवली व वेंगुर्ला नगरपालिकेने अग्मीशमन यंत्रणा यात्रांसाठी पुरवावी, आरोग्य विभागाने आरोग्य पथक द्यावे, देवस्थान समितीने यात्रा कालावधीत स्वच्छता ठेवण्याचे नियोजन संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकायार्ने करावे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बस फेऱ्यांचे नियोजन करावे आदी सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग